Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचा भावात काहीसे चढ उतार; कापूस बाजार, सोयाबीन, हरभरा तसेच तूरीचे काय आहेत दर?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी झाले होते. सोयाबीनचे वायदे १२.३२ डाॅलर प्रतिबुसेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३८० डाॅलरवर आले होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव क्विंटलमागं ५० रुपयांनी कमी झाले होते.

प्रक्रिया प्लांट्सनीही आपले भाव कमी केले होते. मात्र सरासरी भावपातळी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपापर्यंत ७८.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

तर देशातील वायदे ५७ हजार ४०० रुपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक स्थिर आहे. त्यामुळे कापसाचे भावही ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्क काढले. त्यामुळे हरभऱ्याच्या भावातील तेजी काहीशी थांबली आहे. देशात कडधान्याचे भाव वाढले. देशातील हरभरा उत्पादन यंदा घटले आहे. तसेच मागणी असल्याने भाव हमीभावापेक्षा वाढले होते.

हे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयातशुल्क काढले. यामुळे भाव ५५०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंत नरमले होते. पण हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही, असेही अभ्यासकांनी सांगितले. 

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. सध्या लग्नसराईमुळे हळदीला चांगला भाव मिळत आहे. तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमीच आहे. देशातील उत्पादन यंदा घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT