Cotton Procurement  Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Procurement : खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत

Cotton Market Rate : खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. सध्या खेडा खरेदीत कमाल सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Swapnil Shinde

Jalgaon News : खानदेशात कापसाची खेडा खरेदी रखडत सुरू आहे. सध्या खेडा खरेदीत कमाल सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. प्रतिदिन सात ते आठ हजार क्विंटल कापसाची आवक खानदेशात होत आहे. कापसाची आवक कमी आहे. यामुळे कापूस प्रक्रिया उद्योगातील कामही संथ असल्याचे दिसत आहे.

खानदेशात रोज ३० ते ४० हजार क्विंटल कापसाची आवक अपेक्षित आहे. खरेदी रखडत सुरू आहे. कापसाचा दर्जा चांगला आहे. परंतु अपेक्षित दर नाहीत. सध्या खेडा खरेदीत कापसाला चार प्रकारचे दर सांगितले जात आहेत. त्यात ६६०० ते ६८०० व ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. चार वेगेवेगळे दर असल्याने शेतकऱ्यांतही संभ्रम आहे.

खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योगही सुरू आहे. परंतु अनेक कारखानदार सावध भूमिकेत आहेत. दिवाळीपर्यंत बाजारातील चित्र स्पष्ट होईल. या वेळेस खेरदीची गती किती व कशी ठेवायची याबाबत खरेदीदारांनी नियोजन केले आहे.

अनेक कारखानदारांनी फक्त २० ते २५ टक्के क्षमतेने काम सुरू ठेवले आहे. तर काही कारखानदारांनी कामच सुरू केलेले नाही. गुजरातमधील खरेदीदारांकडूनही फारशी खरेदी खानदेशात सुरू नाही. तसेच मध्य प्रदेशातूनही फारशी मागणी नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजार समितीत कापसाचे रोज लिलाव होत आहेत. परंतु तेथेही कापसाला हमीभावापेक्षा अधिकचा दर अपवादानेच मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ५० जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे २० कारखाने कापसावर प्रक्रिया सध्या करीत असल्याची माहिती मिळाली.

हमीभावाने खरेदीची मागणी

हमीभाव ६६२० (मध्यम धागा) व ७०२० रुपये (लांब धागा) प्रतिक्विंटल असा आहे. हमीभावापेक्षा कापसाचे दर कमी आहेत. अशातच शासकीय खरेदीची मागणी मागील आठवड्यातच शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने तातडीने बाजारात हस्तक्षेप करून शासकीय खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT