Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याचे भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे केळी दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, हिरवी मिरची आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या आज सुधारणा दिसून आली. तर सोयापेंडही काहिसे वाढले होते. सोयाबीनचे वायदे आज दुुुपारपर्यंत १०.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९१ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ३७५ ते ४ हजार ४७० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.७९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५६ हजार रुपयाने व्यवहार झाले. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मका नरमला

मक्याच्या बाजारात मागील ३ दिवसांपासून नरमाई दिसून आली. दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढत आहे. तसेच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त दिसत आहे. परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचे दिसत आहे. मका सध्या बाजारात १६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर बाजारातील आवक यापुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Meal Export Subsidy : सोया पेंड निर्यात अनुदानातून सोयाबीनला मिळेल का ‘बूस्ट’?

Sugarcane Crushing Season : राज्य सरकार नमले; गाळप हंगामाला मान्यता

Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

SCROLL FOR NEXT