Market bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी साडे चार हजारांचा भाव

Market bulletin : सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून आले. पण सरासरी भावपातळी मात्र कायम होती.

Anil Jadhao 

1. कापसाच्या वायद्यांमध्ये चालू आठवड्यात काहीशी संमिश्र स्थिती होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊ ६० हजार ५०० रुपयांवर बंद झाले होते. बाजार समित्यांमध्ये कापसाची  आवक खूपच कमी असून भावपातळी सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून कापूस भावपातळी सुधारण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

   
2. देशातील बाजारात कांद्याचे भाव आजही दबावातच आहेत. बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. तराही कांदा भाव स्थिर आहेत. सध्या कांद्याला बाजारात सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव यापुढील काळात हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.  

3. गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने गहू निर्यातबंदी केली तसेच गव्हावर स्टाॅक लिमिटही लावले. पण गव्हाचे भाव कमी होण्याऐवजी पुन्हा वाढत आहेत. सणांच्या पार्श्वभुमीवर गव्हाला मागणी वाढली आहे. त्यामुळे गव्हाचे भाव सुधारत आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

4. सध्या बाजारात पेरूची आवक वाढलेली दिसते. तर पेरुला उठावही चांगला आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून पाऊस नाही. त्यामुळे बाजारात येणाऱ्या पेरूची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे पेरुला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही पेरुची बाजारातील आवक आणि उठाव चांगला राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरुचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढ उतार दिसून आले. पण सरासरी भावपातळी मात्र कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे प्रतिबुशेल्स १३.६४ डाॅलरवर बंद झाले. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०१ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर दिसतात. सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळला. सोयाबीन प्रक्रिया प्लांट्स नव्या हंगामाच्या आधी मेटनन्सवर जातात. सध्या अनेक प्लांट्स मेंटनन्सवर आहेत. त्यामुळे सोयाबीनचे व्यवहार मंदावले आहेत. तर बाजारातील आवकही कमी दिसते. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे भाव प्रतिक्विंटल ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील सोयाबीन लागवड गेल्यावर्षीपेक्षा १ टक्क्याने वाढलेली दिसते. पण सोयाबीनच्या पिकाला पावसातील खंडाचा मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पिकाला पाण्याचा ताण बसत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. परिणामी सोयाबीनच्या भावाला पुढील काळात आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT