Agriculture Market
Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आल्याचे दर ?

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा दिसून आली. मागील काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७३.१७ सेंटवर होते. देशातील वायदेही ५७ हजार ८०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली.कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज पुन्हा नरमाई दिसून आली. याचा दबाव देशातील बाजारावरही कायम आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.५३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३४१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कांद्याच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये काही बाजारांमध्ये काही प्रमाणात चढ उतार पाहायला मिळाले. नाफेडची खरेदी आणि चांगली मागणी त्यातच बाजारातील कमी आवक यामुळे दराला चांगला आधार मिळत आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. यंदा देशातील कांदा उत्पादन घटले. त्यामुळे चांळीत कांदा कमी आहे. पण निर्यातबंदी असल्याने बाहेर जाणारा बहुतांशी कांदा देशातच राहील, याची सोय सरकारने केली. मात्र यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

सरकारने आयात शुल्क काढून आणि स्टाॅक लिमिट लावून दर कमी करण्याचा प्रयत्न केला. पण आयातीवरील मर्यादा आणि देशातील कमी उपलब्धता यामुळे हरभरा भाव तेजीत आहेत. देशातील बहुतांशी बाजारात हरभऱ्याचे भाव ६ हजारांच्या दरम्यान आहेत. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

मागील वर्षभर आल्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tamarind Pest : चिंचेवर पहिल्यांदाच आढळून आला अळीचा प्रादुर्भाव

Crop Loan : धाराशिवमध्ये पीककर्जाचे वाटप ३५ टक्क्यांवर

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा

Irrigation Project : ‘वाकुर्डे’च्या दुसऱ्या टप्प्यातील काम गतीने

Crop Damage Compensation : ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित

SCROLL FOR NEXT