Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, गहू, आले आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा नरमाई आली आहे. सोयाबीनचे वायदे शुक्रवारी १२.१८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर देशात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भावही कमी केले होते.

त्यामुळ सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर सोयातेलाच्या पडलेल्या भावाचा दबाव सोयाबीनच्या भावावर येत आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही कमी झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी ७७.१८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे कमी होऊन ५७ हजार १०० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते.

बाजार समित्यांमधील भावपातळी कमीच होती. कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला, 

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी कायम आहे. गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे. पण दुसरीकडे सरकारच्या धोरणांचाही दबाव दरावर दिसून येत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला.

ध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT