Soybean Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Market: ब्राझीलने ९० टक्के सोयाबीन विकलं; नव्या हंगामाची पेरणी सुरु

Brazil Soyabean : ब्राझीलमध्ये चालू हंगामात जवळपास १ हजार ५३० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. हा ब्राझीलचा आतापर्यंतचा उत्पादनाचा विक्रम होता.

Anil Jadhao 

Soyabean Crop : ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाले होते. पण ब्राझीलमधील एकूण उत्पादनापैकी तब्बल ९० टक्के सोयाबीनची विक्री झाली आहे. तर नव्या हंगामाच्या आधी जुने सोयाबीन विक्री करण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत.

ब्राझीलमध्ये चालू हंगामात जवळपास १ हजार ५३० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. हा ब्राझीलचा आतापर्यंतचा उत्पादनाचा विक्रम होता. त्यामुळे सोयाबीनचा जास्त स्टाॅक शिल्लक राहून नव्या हंगामात दबाव येतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. पण सोयाबीनचे भाव कमी झाल्याने ब्राझीलच्या सोयाबीनला मागणी वाढली. परिणामी एकूण उत्पादनापैकी ९० टक्के माल विकला गेला आहे. तर उर्वरित मालही शेतकरी विकत आहेत.

ब्राझीलमध्ये सध्या सोयाबीनची पेरणी सुरु आहे. त्यामुळे शेतकरी नव्या सोयाबीन विक्रीचे फ्यूचर सौदेही करत आहेत. ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक चतुर्थांश सोयाबीनची विक्रीचे सौदेही केले आहेत. पण ब्राझीलमधील काही भागात वातावरण पोषक नाही. काही भागात उष्णता जास्त असल्याने पेरणीत आडथळे येत आहेत. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी नव्या सोयाबीन विक्रीचे सौदेही धीम्या गतीने सुरु ठेवले आहेत.

चीन सर्वात मोठा खरेदीदार

ब्राझील जगातील सर्वात मोठी सोयाबीन उत्पादक देश आहे. तर चीन सर्वात मोठा आयातदार देश आहे. ब्राझील आपलं जास्तीत जास्त सोयाबीन चीनला विकत असतो. ब्राझीलच्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के निर्यात चीनला केली आहे. मागील काही वर्षापासून चीन अमेरिकेऐवजी ब्राझीलकडून सोयाबीनची आयात वाढवत आहे.  

यंदाही विक्रमी उत्पादनाचा अंदाज

ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरु आहे. ब्राझीलचे सोयाबीन जानेवारीच्या मध्यापासून बाजारात यायला सुरुवात होईल. यंदाही ब्राझीलमध्ये विक्रमी सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेचा कृषी विभाग आणि ब्राझीलच्या कृषी विभागाने यंदा १ हजार ६०० लाख टनांवर सोयाबीन उत्पादन पोचेल, असा अंदाज व्यक्त केला. पण सध्या वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पेरणीवर आणि पिकावर होत आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर याचा परिणाम उत्पादकतेवर होऊ शकतो. यामुळे विक्रमी अंदाजापेक्षा कमी उत्पादन होऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT