Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीमध्ये काहीसे चढ उतार; कापूस, सोयाबीन , हरभरा, तूरीचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली. दुपारपर्यंत सोयाबीनच्या भाव १२.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड पुन्हा एकदा ३७४ डाॅलर प्रतिटनांवर पोचले आहेत.

देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या बावात किंचित घट काही बाजारात दिसून आली. सोयाबीनचा सरासरी भाव आजही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

कापसाच्या भावातही चढ उतार सुरु आहेत. देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये आजही चढ उतार सुरु होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत ७८.३५ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते.

तर देशातील वायदे ५७ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील आवक स्थिर दिसते. तर बाजार समित्यांमधील दर ७१०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा निर्यातबंदी असताना ज्या पातळीवर होती त्या पातळीवर पोचले आहेत. सध्या सरासरी भावपातळी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला. सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या भावात काहीसे चढ उतार दिसून येत आहेत. पण वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, यामुळे भाव एका पातळीच्या कमी होताना दिसत नाही. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११  हजारांच्या दरम्यान आला. तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते १० हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचला.

बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्यासाठी काही मुद्द्यांवर सहमती; अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ग्रीअर यांची समितीसमोर माहिती

MSP Procurement : केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये; तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांची मागणी

Post Harvest Management: पॅकहाउस उभारणीसह प्रक्रिया पद्धती बसविताना...

Fertilizer Shortage: केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली; युरियाचा साठा स्थिर

Chilli Business Story: मिरची विक्रीला दिले व्यावसायिक रूप

SCROLL FOR NEXT