Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम

Market Bulletin : टोमॅटोच्या भावाची प्रश्न आजही कायम आहे. देशातील बाजारात टोमॅटोचे भाव नरमलेले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोला अगदी १०० रुपये प्रतिक्विंटलपासून भाव मिळत आहे.

Anil Jadhao 

1. देशातील कापूस वायद्यांमध्ये काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशातील वायदे आज सकाळच्या सत्रात काहीसे नरमले आहेत. कापूस वायदे ६१ हजार प्रतिखंडीवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे विक्रमी ८९ सेंट प्रतिपाऊंडर होते. देशातील अनेक भागात आता नवा कापूस दाखल होत आहे. सध्या नव्या कापसाची आवक कमी असली तरी दर मात्र ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असून कापसाला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

2.  देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. देशातील सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसत आहे. त्यातच येलो मोझॅक आणि मूळकुजची समस्या वाढली आहे. विदर्भ आणि मराठवड्यातील अनेक भागात याची समस्या वाढली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. तर सोयाबीनला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजारांचा भाव मिळत आहे.

3. देशातील बाजारात आल्याची आवक मागील काही महिन्यांपासून कमीच आहे. त्यामुळे आल्याचे भाव वाढलेले आहेत. पण आल्याच्या भावातील तेजी काहिशी कमी झालेली दिसते. आल्याचे भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहेत. आल्याची बाजारातील आवक पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आल्याचे भावही तेजीत राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

4. बाजारात सध्या ज्वारीला चांगला उठाव आहे. पण बाजारातील ज्वारीची आवक घटलेली आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत दिसतात. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. देशात यंदा कमी पावसामुळे ज्वारी पिकालाही फटका बसत आहे. परिणामी पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

5. टोमॅटोच्या भावाची प्रश्न आजही कायम आहे. देशातील बाजारात टोमॅटोचे भाव नरमलेले आहेत. शेतकऱ्यांना टोमॅटोला अगदी १०० रुपये प्रतिक्विंटलपासून भाव मिळत आहे. म्हणजेच एक किलोसाठी एक रुपया. टोमॅटो पिकाला सध्या पावसाचा फटकाही बसत आहे. देशातील अनेक भागात मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तसेच ढगाळ वातवरणही आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. पण भाव मात्र वाढायचं नाव घेईना. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ४०० ते ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील टोमॅटोची आवक सध्याही वाढलेलीच दिसते. त्यामुळेच टोमॅटोच्या भावावर दबाव आल्याचं व्यापारी सांगतात. तर सरकारला टोमॅटोचे भाव वाढू द्यायचे नाहीत. त्यामुळे सराकर टोमॅटोच्या भावावर दबाव ठेऊन आहे, असे शेतकरी सागंतात.

सरकारच्या धोरणांचा अप्रत्यक्ष दबाव बाजारावर आहेच. त्यातच आधी पावसात मोठा खंड आणि आता पावसाळी वातावऱणामुळे टोमॅटोचे नुकसान वाढत आहे. पण कमी झालेले भाव पाहून काही शेतकरी आताही प्लाॅट सोडून देत आहेत. पुढील काही दिवस टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम दिसू शकतो. त्यानंतर मात्र दरात काहिशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT