Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : पपईला चांगला उठाव; कापूस, सोयाबीन, मका, लसूण काय आहेत आजचे दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापूस बाजारातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सट्टेबाजीमुळे कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे. तर आज दुपारपर्यंत वायदे ८१.४५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५८ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावपातळी कायम आहे. देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव आजही प्रतिक्विंटल ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे. सोयाबीनची भावपातळी एका मर्यादेपलीकडे सरकायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे वायदे कमी जास्त होत आहेत. देशातील बाजारातही सोयाबीन काहीसे कमी जास्त होत असले तरी एक पातळी स्थिर दिसते. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 


काकडीला सध्या चांगला उठाव आहे. वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते. सध्या बाजारातील आवक आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे. लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळेही मागणी आहे. सध्या काकडीला राज्यभरात प्रतिक्विंटल सरासरी १५०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर चांगले राहू शकतात, असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

उन्हामुळे सध्या पपईलाही चांगला भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक कमी असल्याने भावही चांगला मिळत आहे. काही आठवड्यांपुर्वी ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल असलेली पपई सध्या १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे. पपई पिकाला सध्या वाढती उष्णता आणि पाणीटंचाईचा फटका बसत आहे. बहुतांशी भागातील पपईचा हंगामही आटोक्यात आला. त्यामुळे बाजारातील आवक आणखी कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

राज्यातील बाजारात वांग्याचे भाव टिकून आहेत. सध्या लग्न सराईमुळे वांग्याला चांगला उठाव आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाईमुळे वांग्याचं पीक कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील वांग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे राज्यातील बाजारात वांगी प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत. बाजारातील आवक आणखी काही दिवसांनंतर पुन्हा कमी होईल, असा अंदाज आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT