Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी वाढला. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काढले होते.

तर एनसीडीईएक्सच्या खरेदी केंद्रावर आज ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनमधील चढ उतार कायम आहेत. ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.

कापसात नरमाई

देशातील बाजारात कापसाची आवक वाढत आहे. त्याचा कापसाच्या दरावर दबाव येत आहे. कापसाला देशातील बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कापसाला आजही देशातील बाजारात ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला.

तर वायद्यांमध्ये भाव काहिसे कमी होऊन ५५ हजार ७५० रुपये प्रतिखंडीवर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदेही कमी होऊन ७०.३१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापूस बाजारातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

कांदा भावात काहिशी नरमाई

कांद्याच्या सरासरी भावात भावात मागील ३ दिवसांपासून काहिशी नरमाई आलेली दिसते. कांद्याच्या भावात चढ उतार मागील १५ दिवसांपासून वाढले. मात्र दरातील नरमाई टिकून राहीली नव्हती. पण देशातील काही भागात खरिपातील मालाची आवक वाढत आहे.

तर सरकार मोठ्या बाजारांमध्ये कांदा भाव कमी करण्यासाठी विक्री करत आहे. त्याचा परिणाम कांदा भावावर दिसून येऊ असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याच्या भावात चढ उतार

आल्याच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार दिसून येत आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. मात्र नव्या हंगामातील पीक पुढील महिना-दोन महिन्यात बाजारात दाखल होईल.

त्यामुळे आल्याच्या भावात चढ उतार दिसून येत आहेत. आज आल्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. आल्याच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे.

त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT