Onion Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याचा भाव बाजारामध्ये स्थिरावला

Market Update : कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात ३ टक्क्यांची तर देशातील बाजारात २ टक्क्यांची वाढ झाली.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या भावात आज चांगली तेजी आली. केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नाही तर देशातील बाजारातही कापसाचे भाव वाढले. कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात ३ टक्क्यांची तर देशातील बाजारात २ टक्क्यांची वाढ झाली.

देशातील बहुतांशी बाजारात कापसाचा भाव आता ७५०० रुपयांच्या दरम्यान पोचला. तर बाजारातील आवकही कमी झाली. यापुढील काळात कापसाच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती. तर देशात भावपातळी कायम आहे. देशातील बाजारातील सरासरी दरपातळी आज ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील आवकही टिकून आहे. तसेच मागणी मंदावलेली आहे. त्यामुळे सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो. आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याचे भाव टिकून आहेत. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत.

त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे. मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT