cotton
cotton  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : रब्बीतील मका उत्पादन घटणार?

Anil Jadhao 

१) कापूस दरात उभारी (Cotton Rate)

बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठी नरमाई आली होती. पण कालपासून दरात सुधारणा दिसत आहे. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८०.३४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.

देशातही काही ठिकाणी कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा दिसली. मात्र सरासरी दरपातळी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाही.

पुढील काही दिवसांत देशातील कापूस आवक नरमल्यानंतर दरातही सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनची भावपातळी कायम (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १४.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४४८ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता.

देशातील सोयाबीन बाजार मात्र जागचा हालण्याचं नाव घेईना झालाय. आजही दरपातळी प्रति क्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर होती.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई, देशातील वाढती आवक आणि खाद्यतेल बाजार दबावात आल्यानं सोयाबीनवर दबाव आहे. पण हा दबाव कायम राहणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

३) बटाटा बाजारभाव दबावात (Potato Rate)

राज्यातील प्रमुख बाजारांक बटाटा आवक वाढल्यामुळं दर नरमले आहेत. मागील काही दिवसांमध्ये बटाटा दरात क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांची नरमाई आली. सध्या बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी ९०० ते १ हजार ४०० रुपयांचा भाव मिळतोय.

यंदा देशातील बटाटा उत्पादनात मोठी वाढ झालीय. त्यामुळे पुढील काळातही आवकेचा दबाव जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं बटाट्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

४) कारल्याचे दर तेजीत

कारल्याचे दर सध्या तेजीत आहेत. बाजारात कारल्यांची आवक मागील काही दिवसांपासून घटली आहे. त्यामुळे कारल्याच्या दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगत आहेत.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या महत्वाच्या बाजारांमध्ये कारल्याला २ हजार ते ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळतोय. पुढील काही काळ कारली आवक मर्यादीतच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कारल्याच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) सध्या मक्याला काय भाव मिळतोय? (Maize Rate)

यंदा रब्बी हंगामात पेरण्यांसाठी पोषक हवामान होते. त्यातच लागवडीच्या काळात मक्याचे भाव तेजीत होते. त्यामुळे रब्बीत मक्याची लागवड ३ टक्क्यांनी वाढली. यंदा देशात जवळपास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याचा पेरा झाला.

रब्बीतील मका लागवड वाढली तरी केंद्र सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात देशातील मका उत्पादन १०८ लाख टनांवरच स्थिरावेल, असं म्हटलं. मागील रब्बी हंगामात ११० लाख टनांच्या आसपास उत्पादन झालं होतं. यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णता जास्त होती.

तर मार्च महिन्यात देशातील अनेक मका उत्पादक भागांमध्ये पावसानं तडाखा दिला. त्याचा मका उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं शेतकरीही सांगतायत. एप्रिलमध्ये रब्बीतील मका बाजारात येईल. मक्याची काढणी सुरु झाल्यानंतर उत्पादनात नेमका किती फटका बसला हे स्पष्ट होईल.

पण पाऊस झालेल्या भागात मक्याच्या गुणत्तेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या बाजारात मक्याची आवक खूपच कमी आहे. हंगामाच्या तोंडावर बाजार तसा सुस्तच आहे. सध्या मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपये क्विंटल दर मिळतोय. मका निर्यातीचं चित्र चांगलं आहे.

तसेच देशांतर्गत मागणीही वाढती आहे. त्यामुळे मक्याचे दर टिकून राहतील. आवक वाढल्यावर मक्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार दिसेल, असा निर्यातदार आणि व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये बिनधोकपणे गव्हाची अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग

SCROLL FOR NEXT