Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील बाजारात सोयाबीनमध्ये सुधारणा

Market Bulletin : सोयाबीनच्या भावात सध्या सुधारणा दिसत आहे तर कापसाच्या भावात दबाव येतना दिसतो. त्यामुळे बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १३.६१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. कालच्या तुलनेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत वाढले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये ४४० डाॅलरवर होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर होते. बाजारातील सोयाबीनची आवक आजही काहिशी वाढ झाली होती. तर दिवाळी सणांमुळे बाजारात आवक काहिशी अधिक असल्याचे व्यापारी सांगतात. तर दिवाळीनंतर आवक कमी होण्याची शक्यता असून दरातही काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

कापसाच्या वायद्यांमध्ये आजही काहिशी नरमाई आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आज दुपारपर्यंत जवळपास एक टक्क्याने घट झाली. सोयाबीनचे वायदे ७८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचले होते. देशातील कापूस वायदेही आज ४२० रुपयांनी कमी झाले होते. कापसाचे वायदे आज दुपारी प्रतिपाऊंड ५७ हजार ६२० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील कापसाची आवकही चांगली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावावर दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
 

हळदीच्या भावात मागील आठवडाभरात काहिशी सुधारणा झाली. सणांमुळे सध्या हळदीला उठाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सणांमुळे हळीच्या भावात सुधारणा होत आहे. दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा ५० ते ६० टक्क्यांनी कमी दिसते. असं असतानाही हळदीचा बाजार अपेक्षेपेक्षा दबावातच आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजारांचा भाव मिळत आहे. यंदाही हळदीची लागवड कमीच आहे. तर हळद पिकाला कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. तर स्टाॅकही कमी आहे. त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात ज्वारी चांगलाच भाव खात आहे. राज्यातील अनेक बाजारात आजही ज्वारीच्या भावात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची वाढ झाली होती. ज्वारीचे भाव आज ३ हजार ८०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. ज्वारीच्या उत्पादनात मागील दोन वर्षे घट दिसून आली. पण ज्वारीला वाढलेली मागणी कायम आहे. यंदाही खरिप हंगामातील ज्वारी उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. तर रब्बी हंगामातही ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. कारण महत्वाच्या ज्वारी उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा कमी पाऊस पडला. दुष्काळी स्थिती आहे. याचा परिणाम ज्वारी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्वारीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज आहे.

हिरव्या मिरचीला चांगलाच उठाव मिळत आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. हिरव्या मिरचीला मात्र बाजारात चांगली मागणी आहे. यामुळे दर तेजीत आहेत. सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. मिरची पिकाला अनेक भागात पाण्याची टंचाई भासत आहे. तर नव्या लागवडीही पाण्याअभावी रेंगाळल्या आहेत. नव्या लागवडी मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीची बाजारातील आवक मर्यादीतच राहून भावातील तेजीही टिकून राहू शकते, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT