Market bulletin  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीन, कापसाचे भाव काय राहिले?

Market bulletin : आपली सोयाबीन काढणी झालीच असलं किंवा काढणीच्या तयारीत असाल. दुसरीकडं कापसाचीही पहिली वेचणी अनेक ठिकाणी सुरु झाली. ही पीक आता आपल्या घरात यायला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्वाच्या पिकांचा सध्याचा बाजार कसा आहे? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली सोयाबीन काढणी झालीच असलं किंवा काढणीच्या तयारीत असाल. दुसरीकडं कापसाचीही पहिली वेचणी अनेक ठिकाणी सुरु झाली. ही पीक आता आपल्या घरात यायला सुरुवात झाली. त्यामुळे या महत्वाच्या पिकांचा सध्याचा बाजार कसा आहे? पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

आजची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आज सोयाबीनच्या बाजारात काहिशी सुधारणा दिसून आली. शनिवारच्या तुलनेत बाजारात आज १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. भाव आज ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांपर्यंत वाढला. तर आवक शनिवारच्या तुलनेत वाढली होती. प्रक्रिया प्लांट्सचे भाव मात्र आजही ५ हजार ते ५ हजार १०० रुपयांवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या भावात जवळपास दोन टक्क्यांची सुधारणा झाली होती. तसेच सोयातेल आणि इतर खाद्यतेलाच्या भावातही वाढ झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली सुधारणा आणि सोयाबीनला वाढलेला उठाव यामुळे भावात सुधारणा झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

कापसामध्येही आज सुधारणा दिसून आली. बाजार समित्यांमध्ये क्विंटलमागं आज किमान ५० रुपयांची वाढ झाली. आज कापसाचा सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होता. वायद्यांमध्येही आज कापूस खंडीमागे ३४० रुपयांनी वाढला होता. सध्या बाजारात होणारी कापसाची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आज कापसाचा भाव सुधारला होता. यामुळे देशातील बाजारात आज काहिशी सुधारणा दिसली, असे अभ्यासकांनी सांगितले. यंदा देशातील कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. सध्या कापसाचे भाव दबावात असले तरी पुढील काळात भावात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे.

टोमॅटोच्या भावात आजही क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. अनेक बाजारात ही सुधारणा दिसून आली. पण काही बाजरांमध्ये भावपातळी वाढली नाही. सध्या टोमॅटोला सरासरी ९०० ते एक हजारांचा भाव मिळाला. पण अनेक बाजारात आजही टोमॅटो ६०० ते ७०० रुपये भाव होत. बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून हळूहळू कमी होत आहे. त्यातच राज्यातील अनेक भागात यंदा कमी पाऊस झाला. यामुळे नव्या लागवडीला पाणी कमी पडत आहे. तर भाव कमी असल्याने काही शेतकऱ्यांनी प्लाॅट सोडूनही दिले होते. वातावरणातील बदलाचा टोमॅटो पिकाला फटकाही बसला. या सर्व कारणांनी टोमॅटोच्या सरासरी भावात काहिशी वाढ झाली. तसेच पुढील काळात टोमॅटोचे भाव आणखी सुधारू शकतात, असाही अंदाज आहे.

आज मक्याच्या भावात अनेक बाजारांमध्ये ५० ते १०० रुपयांची नरमाई दिसून आली. मक्याला आज सरासरी १ हजार ७०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आज बाजारातील आवक काहिशी अधिक असल्याने भावावर दबाव आल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. तर खरिपातील मका उत्पादन यंदा घटले आहे. त्यामुळे बाजारातील आवक जास्त काळ वाढलेली दिसणार नाही. तसेच मक्याला उठावही बऱ्यापैकी आहे. यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.



बाजारात ज्वारी चांगलाच भाव खात आहे. राज्यातील अनेक बाजारात आजही ज्वारीच्या भावात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची वाढ झाली होती. ज्वारीचे भाव आज ३ हजार ८०० ते ४ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. ज्वारीच्या उत्पादनात मागील दोन वर्षे घट दिसून आली. पण ज्वारीला वाढलेली मागणी कायम आहे. यंदाही खरिप हंगामातील ज्वारी उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. तर रब्बी हंगामातही ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. कारण महत्वाच्या ज्वारी उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा कमी पाऊस पडला. दुष्काळी स्थिती आहे. याचा परिणाम ज्वारी उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्वारीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT