Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: पपईला चांगला उठाव; मूग, पपई, कापूस तसेच काय आहेत सोयाबीन भाव

Daily Commodity Rates: आज आपण पपई, मूग, साखर, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

पपईला चांगला उठाव

राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे. त्यामुळे पपईला सध्या १७०० ते २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे आवकही मर्यादीत आहे. पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो,  असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.    

साखरेच्या दरात सुधारणा

देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांचे गाळप लवकर संपत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कारखाने बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्वच संस्थांनी यंदा देशातील साखर उत्पादनात १९ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे अंदाज दिले आहेत. साखरेच्या दरात मागील दोन महिन्यांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत झाली आहे. तस सध्या बाजारात साखर ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयाने विकली जात आहे. साखरेच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मुगाचे दर स्थिर

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९८ डाॅलर प्रतिटनांपर्यंत कमी झाले होते. देशात प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार १०० ते ४ हजार २५० रुपयांच्या दरम्यान स्थिर होते. तर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला ३ हजार ८०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या दरात काहीशी सुधारणा

कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. देशात आजही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा काही बाजारात दिसली. कापसाचा सरासरी भाव आता ७ हजारांच्या पुढे गेल्याचे दिसते. कापसाला आज ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान मिळाला. बाजारातील कापसाची आवक आजही ८० हजार गाठींच्या दरम्यान होती. देशातील कापूसाची आवक मार्चनंतर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT