Maize Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Maize Market : देशात मक्याला मागणी कायम; निर्यात वेगाने सुरु

रब्बीतील पेरा २२६ लाख हेक्टरवर पोचला. त्यामुळं रब्बीतील मका उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

Team Agrowon

१) सोयाबीन दरात काहीशी सुधारणा (Soybean Rate)

देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव (Soybean Rate) दबावात आहेत. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सरासरीपेक्षा कमीच आहे. सध्या बाजारात ३ लाख ५० हजार ते ४ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे.

कालपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपये दर मिळाला.

देशातील सोयाबीन दर पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

२) कापूस बाजार दबावातच (Cotton Market, cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. काल काॅटलूक ए इंडेक्स ९८.८० सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर आयसीईवरील कापूस वायदे ८५.६१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारातही कापसाच्या दरातील नरमाई कायम आहे.

आजही देशात कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८  हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाचे भाव सध्या दबावात असले तरी पुढील काळात दर वाढतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

३) आल्याचे दर नरमले

राज्यातील बाजारात आल्याची आवक सध्या कमीच आहे. मात्र तरीही आल्याचे दर दबावातच आहेत. आल्याचे बाजारभाव मागील तीन वर्षांपासून कमी आहेत. क्विंटलमागं जवळपास निम्मानं कमी झाले. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत.

सध्या आल्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याची ही दरपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

४) केळीचे दर तेजीत

राज्यातील काही भागांमध्ये केळी काढणीला सुरु झाली आहे. त्यातच सध्या केळीला चांगला उठाव असल्यानं दरही चांगला मिळतोय. बाजारातील आवक सध्या कमी आहे. यावल, पंढरपूर, नाशिक या बाजारांमधील आवक काहीशी अधिक आहे.

मात्र इतर बाजारात सरासरीपेक्षा कमी आवक दिसत आहे. त्यामुळे सध्या केळीला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. केळीची ही दरपातळी आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

५) मक्याचे दर टिकून राहतील का?

देशातील बाजारात सध्या मक्याची आवक वाढली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील काही बाजारांमधील आवक वाढली आहे. केंद्र सरकारने पहिल्या अंदाजात यंदा खरिपातील उत्पादन २३१ लाख टन मका उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.

मात्र मका खरिपातील मका पिकाला अनेक भागांमध्ये सततचा पाऊस, कीड-रोग, पावसाचा खंड यामुळं फटका बसला. त्यामुळं खरिपातील उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर रब्बीतील लागवड सध्या ३.१९ टक्क्यांनी अधिक दिसत आहे.

रब्बीतील पेरा २२६ लाख हेक्टरवर पोचला. त्यामुळं रब्बीतील मका उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण रब्बीतील पिकालाही अतिथंडी, बदलते वातावरण आणि वाढत्या किमान तापमानाचा फटका बसत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला चांगाली मागणी आहे. दरही टिकून आहेत. त्यामुळं देशातून मका निर्यातही सुरळीत सुरु आहे. सध्या देशातील बाजारात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांपर्यंतचा दर मिळतोय.

रब्बीतील मका आवकेचा पुढील काळात बाजारावर दबाव येऊ शकतो. रब्बीतील मका येईपर्यंत सध्याच्या दरात २०० रुपयांपर्यंत तेजी मंदी राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT