Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन भाव, कांदा बाजार, हळद तेजी

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८७.५९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते.

तर देशातील वायदे ६१ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्येही सध्या नरमाई दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.७७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर सोयापेंड ३३४ डाॅलर प्रतिटनांच्या दरम्यान होते.

इकडे देशातील सोयाबीनचा भाव एकाच पातळीभोवती दिसत आहे. सोयाबीन आजही ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील तुरीचा कमी पुरवठा आणि आयात मालाचे जास्त भाव यामुळे तुरीच्या बाजारात मागील काही दिवसांमध्ये सुधारणा दिसून आली. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा १० हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपये होता. बाजारातील आवक घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.

आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ज्वारीचा बाजार सध्या शेतकऱ्यांना निराश करत आहे. कारण नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर नरमलेले ज्वारीचे भाव आजही दबावातच आहेत. दुसरीकडे बाजारातील आवक स्थिरावली आहे.

ज्वारीचा बाजार सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी २ हजार १०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे.  ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT