Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसाचे भाव टिकूनच; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे केळी दर

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, केळी आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुुुपारपर्यंत ९.९४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९१ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले.

देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७०.२१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत.

जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५५ हजार ९०० रुपये भाव मिळाला. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याच्या दरात काहिशी सुधारणा

मक्याच्या भावात मागील ३ दिवसांमध्ये काहिशी सुधारणा झाली आहे. मक्याचा सरासरी बाजारभाव १०० ते २०० रुपयांनी कमी झाला. सुरुवातीला मक्यामध्ये ओलावा अधिक होता. त्यामुळे बाजार दबावात आला होता.

आता ओलावा कमी झाल्याने मक्याचा सरासरी भाव १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान आहे. मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

गव्हाचे भाव तेजीतच

देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे.

बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT