Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि तीळ पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी काहिशी नरमाई आली होती. सोयाबीनसह सोयापेंडचे भाव काहीसे नरमले होते. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे वायदे काहीसे कमी होऊन १०.३७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३३० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात काहिशी वाढ

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भाव कहिसे वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७३ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे ५७ हजार ३०० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

कांद्यात चढ उतार

कांद्याच्या  भावात राज्यातील बाजारांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. मागील आठवडाभरापासून कांद्याच्या भावात चढ उतार कायम होते. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या दरात सुधारणा

टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाल मोठा फटका दिला. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

तिळाचे भाव नरमले

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT