Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा भाव टिकून; कापूस, सोयाबीन, हरभरा, तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, टोमॅटो आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा चढ उतार सुरु झाले. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही कापूस दबावातच दिसून येतो. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी ७२.२३ सेंटवर होते. देशातील वायदेही ५८ हजार ४०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी आहे. तरीही कापसाला कमी असलेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या भावातील नरमाई याचा परिणाम होत आहे. कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या बाजारातही चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई आली होती. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.५८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 


हरभरा बाजारात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बहुतांशी बाजारांमध्ये आवकही कमीच आहे. सरकारने हरभऱ्यासाठी आयात खुली केल्यानंतर भावातील वाढ थांबलेली दिसते. दुसरीकडे हरभऱ्याचा उठाव चांगला आहे. त्यामुळे हरभरा भाव आजही ५ हजार ७०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही महीने हरभरा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकंनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारात सध्या टोमॅटोची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. पावसामुळे आवकेवर आणखी परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

गव्हाच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सरकारने गव्हावर स्टाॅक लिमिट लावल्याचा परिणाम दरावर काही प्रमाणात दिसून आला. बाजारात गव्हाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी झाल्याने सध्या गव्हाचे भाव मात्र सरकारला अपेक्षित पातळीवर कमी झाले नाहीत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT