Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभऱ्यातील तेजी टिकून; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच हरभरा दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Update : आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांनी पुन्हा एकदा निचांकी पातळी गाठली. तर देशात वायदे स्थिरावले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहेत. आज दुपारी ७०.७९ सेंटवर होते. देशातील वायदेही ५६ हजार २४० रुपयांवर आहेत.

बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची काहीशी कमी झाली. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई दिसून आली. बाजारातील चढ उतार कायम असून दबावही आहे. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.६६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६४१ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

सरकार जास्तीत जास्त तूर आयात करून भाव कमी करण्याचा दावा करत आहे. पण आयात तुरीचे भावही १२ हजारांच्या दरम्यान आहेत. याचा आधार देशातील दरालाही मिळत आहे. देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत.

त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे. सध्या तुरीला सरासरी ११ हजार ते ११ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्याचा भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. त्यातच महत्वाच्या हरभरा निर्यातदार ऑस्ट्रेलियातही हरभरा चांगलाच भाव खात आहे.

त्यामुळे आयात हरभराही महाग पडत आहे. परिणामी हरभऱ्याचे भाव बहुतांशी बाजारांमध्ये ६ हजारांवर पोचले. तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ८०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासन काहीसे चढ उतार दिसत आहेत. मात्र कांद्याची सरासरी दरपातळी वाढलेली दिसते. बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठव, यामुळे कांद्याटचे भाव सुधारल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या कांद्याचा सरासरी भाव २२०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे. तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशाने थांबले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात कांद्याची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT