Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचे भाव वाढल्यानंतर ग्राहकांची मसूरला पसंती

Market Bulletin : तुरीच्या डाळीचे भआव वाढल्यानंतर देशात मसूरलाही उठाव मिळत असतो. देशात मागील काही महिन्यांपासून मसूरला उठाव वाढत आहे. परिणामी मसूरच्याही भावात सुधारणा झाली आहे.

Anil Jadhao 

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयापेंडचे वायदे १२.९४ डाॅलरवर होते. तर सोयापेंड ४२३ डाॅलरवर आले होते. देशातील बाजारात  सोयाबीनची आवक वाढत आहे. तर सोयाबीनमधील गुणवत्ता आता चांगली येत आहे. पण सोयाबीनची भावपातळी मात्र स्थिरावलेली दिसते. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनचा हा भाव पुढील काळातही कायम दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. कापसाच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे देशात आज खंडीमागे ४०० रुपयांनी वाढले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी पुन्हा ८४ सेंटचा टप्पा पार केला होता. देशातील बाजारात कापसाची आवक सध्या वाढत आहे. पुढील काळात कापसाची आवक आणखी वाढू शकते. त्यामुळे कापसाचा बाजार आणखी काही दिवस याच पातळीवर दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

3. देशातील बाजारात कांद्याचे भाव काहिसे वाढले आहेत. सध्या बाजारातील कांदा आवक सरासरीच्या तुलनेत कमी झाली आहे. परिणामी कांद्याच्या भावात सुधारणा झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात कांद्याची आवक आणखी कमी होत जाऊन दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

4. आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे. आल्याची खरेदी काहीशी मंदावली आहे. सध्या आल्याचे भाव प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. परंतु आल्याचे दर कमी होणार नाहीत. आल्यातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

5. तुरीच्या डाळीचे भआव वाढल्यानंतर देशात मसूरलाही उठाव मिळत असतो. देशात मागील काही महिन्यांपासून मसूरला उठाव वाढत आहे. परिणामी मसूरच्याही भावात सुधारणा झाली आहे. तुरीला काही प्रमाणात मसूरचा पर्याय समजला जातो. तुरीचे भाव वाढल्यानंतर ग्राहक मसूरला पसंती देतात. परिणामी मसूरला मागणी वाढते. यंदा गेल्या पाच महिन्यांपासून तुरीचे भाव तेजीत आहेत. देशात मागील हंगामात तुरीचे उत्पादन घटले होते. तर आयातीतूनही गरज पूर्ण होत नाही. परिणामी तुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. याचा आधार मसूरलाही मिळत आहे.

देशात मसूरला मागणी वाढल्याचे दिसते. पण मसूरचाही पुरवठा कमीच आहे. त्यातच मसूरचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कॅनडा आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. यामुळे कॅनडामधून होणारी मसूर आयात कमी झाली. सधअया केवळ यापुर्वी झालेल्या सौद्यांमधील मसूरचीच आयात होत आहे. पुढील काळात आयातीचे सौदे होत नाहीत. भविष्यातील व्यवहार सध्या ठप्प झाले आहेत. त्यामुळेही देशात मसूरचे भाव वाढले आहेत. सध्या मसूरला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील मसूरची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती पाहता मसूरचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT