Cotton Market Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Market: उत्तर भारतात सुताचे भाव काहीसे वाढले; कापसाला मागणीही वाढण्याची शक्यता

Cotton Rate : देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून कापूस दरावरील दबाव कायम आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पण उत्तर भारतातील काही बाजारांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये सुताच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली.

Team Agrowon

CottonBajar : नवी दिल्लीः देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून कापूस दरावरील दबाव कायम आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पण उत्तर भारतातील काही बाजारांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये सुताच्या भावात चांगली सुधारणा दिसून आली. यामुळे कापूस दरालाही काहीसा आधार मिळाला. पण देशाच्या इतर भागात सूत आणि कापूस दर स्थिर होते, असे व्यापारी आणि जाणकारांनी सांगितले.

उत्तर भारतात खूप दिवसांनंतर सुताच्या दरात वाढ झाली आहे. कालपासून दिल्ली आणि लुधियाना बाजारात सुताचे भाव किलोमागे ४ रुपयांनी वाढले आहेत. कापड गिरण्यांकडून मागणी वाढल्यामुळे दरात सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कापसाचे भाव टिकून असल्याने सुताचेही भाव कायम होते. त्यामुळे सुताच्या भावात अवास्ताव वाढ केली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कापसाच्या हमीभावात वाढ केल्याने कापसापासून तयार होणाऱ्या सर्वच मालाचे भाव वाढणार, याविषयी कुणाचेही दुमत नाही.

येणाऱ्या सणांच्या काळात सुताला मागणी वाढेल, असा विश्वास सुतगिरण्यांना आहे. त्यामुळे सुतगिरण्यांनी आता सुतावरील सवलत बंद केली. ३० काऊंट कापूस धाग्याची किंमत २५७ ते २६७ रुपये प्रतिकिलो होती. तर २० ते २५ काऊंटचा धारा २४६ ते २५१ रुपये प्रतिकिलोने विकला गेला. लुधियाना सोबतच दिल्ली बाजारातही सुताच्या भावात ही वाढ दिसली.

मागील काही दिवसांपासून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण होते. पण पुढील काळ आता सणांचा आहे. त्यामुळे कापड आणि सुताला मागणी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण सुताच्या दरात झालेली वाढ पुढील काळात टिकून राहील का? हे पाहणे गरजेचे आहे, असेही व्यापारी सांगतात. दिल्ली आणि लुधियाना बाजारात वाढ झाली तरी उत्तर भारतातील इतर बाजारांमध्ये दरात फारशी सुधारणा दिसली नाही. सूत आणि इतर उत्पादनांचे भाव स्थिर दिसले. पाॅलिस्टरचा बाजारही काहीसा स्थिर होता. 

उत्तर भारतात कापसाचे भावही वाढलेले दिसत आहेत. कापड उद्योगाकडून सुताला मागणी येत असल्याने सुतगिरण्यांची कापसाला मागणी वाढली. त्यामुळे उत्तर भारतात कापसाच्या भावातही सुधारणा दिसून येत आहे. कापड उद्योगांकडून सुताला मागणी वाढत असल्याने पुढील काळात कापसाचे भाव वाढलेलेच राहू शकतात, असे संकेत मिळत आहेत, असे व्यापारी आणि ब्रोकर्स सांगतात.

यंदा देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस मागे ठेवला होता. पण उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी कापसाच्या पहिल्या तिमाहीत जास्तीत जास्त विक्री केल्याचे येथील व्यापारी सांगतात. त्यामुळे सध्या उत्तर भारतात कापूस कमी असल्याचेही सांगितले जाते. सध्या कापसाचे भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर रुईचे भाव ५५ हजार ८०० ते ५७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT