Potato Agrowon
बाजार विश्लेषण

Potato Arrival : नगर बाजार समितीत बटाट्याची विक्रमी आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात बटाट्याची दररोज सातशे ते नऊशे क्विंटलपर्यंत आवक झाली.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात बटाट्याची (Potato Arrival) दररोज सातशे ते नऊशे क्विंटलपर्यंत आवक झाली. बटाट्याला प्रती क्विंटल १५०० ते २७०० रुपयांचा दर (Potato Rate) मिळाला. अन्य भाजीपाल्याच्या आवकेतही (Vegetable Arrival) मोठी वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज बटाट्यासह अन्य भाजीपाल्याची दररोज सुमारे दोन हजार क्विटंलपेक्षा अधिक आवक झाली आहे.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात दर दिवसाला टोमॅटोची साधारणपणे १३० क्विंटलपर्यंत आवक होऊन ८०० ते २ हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे. वांगीची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १८००, फ्वालरची ९० क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते ४ हजार, कोबीची ९६ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते अडीच हजार, काकडीची ५९ क्विंटलची आवक होऊन दोनशे ते दीड हजार, गवारची २२ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते सहा हजार, घोसाळ्याची ५ ते १० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते तीन हजार, दोडक्याची ११ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते साडेतीन हजार, कारल्याची २१ क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते साडेतीन हजार, भेंडीची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ५ हजार, वाल शेंगाची १४ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ ते २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते सहा हजार, घेवड्याची १५ क्विंटलपर्यंत साडेतीन ते आठ हजार, बटाट्याची साधारणपणे साडेसातशे क्विंटलपर्यंत आवक होऊन १५०० ते २ हजार ७००, हिरव्या मिरचीची ९० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते साडेचार हजार, शेवग्याची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते अडीच हजार, दुधी भोपळ्याची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते १२०० रुपये, मका कणसाची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन १२०० ते १८०० रुपये, शिमला मिरचीची १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपयाचा दर मिळाला आहे. पालेभाज्यात (शेकडा) : मेथीला तीन ते चार हजार, पालकला तीन ते चार हजार, कोथिंबिरीला तीन हजार तीनशे ते चार हजार रुपयांचा दर मिळाला.

भुईमूग शेंगा, रताळीची आवक

नगर येथील बाजार समितीत आषाढी यात्रेच्या पाश्वभूमीवर रताळी, भुईमूग शेंगाची आवक आक झाली. रताळीची ११५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ३५०० रुपये, भुईमुगाच्या ओल्या शेंगाच्या १७० क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ५ हजारापर्यंत दर मिळाला. डांगर, चवळीचीही बाजारात आवक झाली असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT