Soybean Rate  Agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा सोयाबीन बाजाराला आधार

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तेजी असल्यानं देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्याकांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

अनिल जाधव
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत. दराने मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता.

तर देशातील सोयाबीन बाजार मात्र आजही स्थिर होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तेजी असल्यानं देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्याकांनी व्यक्त केला.

अर्जेंटीना जगात सोयापेंड निर्यातीत महत्वाचा देश आहे. मात्र यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.

अर्जेंटीनातील महत्वाच्या भागात कामी पाऊस असून सोयाबीन पिकाला फटका बसतोय.

त्यामुळं येथील उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज युएसडीएनं व्यक्त केल्यानंतर जागतिक बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहयला मिळाली.

शुक्रवारी सीबाॅटवर सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दराचा टप्पा गाठला. तर चालू हंगामातील उच्चांकी दर होता.

शुक्रवारी सीबाॅटवरील सोयाबीनचे वायदे १५.२८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. मात्र शुक्रवारीही सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार होते.

सोयाबीनसह सोयापेंडच्या दरातही शुक्रवारी मोठी तेजी आली होती. अर्जेंटीना सोयापेंड निर्यात करणारा महत्वाचा देश आहे.

मात्र येथील उत्पादन घटण्याचा अंदाज असल्यानं सोयापेंड निर्मितीही कमी राहणार आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड दरावर झाला.

सोयापेंड विक्रमी पातळीवर


शुक्रवारी सोयापेंडचे दर विक्रमी पातळीवर पोचले होते.

काल सोयापेंडने ४८५ डाॅलर प्रतिटनांवर गेले होते. हा दर मागील सात महिन्यांतील उच्चांकी होता.

मात्र काल बाजार बंद होताना सोयापेंडचा भाव काहीसा कमी होऊन ४७५ डाॅलरवर पोचला.

देशातील दर


आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव तेजीत आहेत. त्यामुळं या दरवाढीचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही मिळू शकतो, असा अंदाज आहे.

पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असली तरी देशातील बाजारात मात्र दर स्थिर होते. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळत आहेत.

देशातील बाजाराला आधार मिळेल का?


सध्या देशातील सोयापेंड आणि सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

मात्र पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढत असल्यानं भारतीय सोयापेंडला मागणी वाढू शकते.

त्यामुळं देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT