Tur Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Tur Rate : तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी

तुरीचा साठा आता कमी झाला. त्यामुळे देशातील तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

Team Agrowon

अनिल जाधव
पुणेः देशात यंदा तूर आयातीचा वेग जास्त आहे. मात्र आता भारताचा मुख्य पुरवठादार आफ्रिकेतून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी येत आहे. येथील तुरीचा साठा आता कमी झाला. त्यामुळे देशातील तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

मागील हंगामात देशातील तूर उत्पादन सरासरीपेक्षा कमी झाले होते. त्यामुळे तुरीला चांगला दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारने विक्रमी आयात करून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केले. ८ लाख ६० हजार टन आयात केल्याने बाजारात तुरीचे दर कोसळले. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.

मात्र यंदा देशातील तूर लागवड कमी झाली. त्यातच पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. परिणामी, यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन सरकारने तूर आयात वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी करार आणि मुक्त आयातीचे धोरण ठरविले.

सरकारच्या या धोरणामुळे देशात यंदा आयातीचा वेग वाढला. देशातील आयात पहिल्या आठ महिन्यांमध्ये ५ लाख टनांवर पोचली. मात्र आता तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी आफ्रिकेतून येत आहे. भारत आफ्रिकेतील देश आणि म्यानमारमधून तुरीची आयात करत असतो. त्यातही आफ्रिकेतून होणारी आयात जास्त असते.
……….
आणखी किती आयात होणार
मागील हंगामात जवळपास सहा ते साडेसहा लाख टन तूर आफ्रिकेतील देशांमधून आयात झाली होती. भारतात मार्चपासून आत्तापर्यंत अंदाजे ५ लाख टन तूर आयात झाली. त्यापैकी जवळपास ४ लाख टन मालावी, मोझांबिक, टंझानिया, युगांडा आणि सुदान या देशांमधून झाली. मात्र पुढील काळात या देशांमधून तूर आयात कमी होण्याची शक्यता आहे. कारण या देशांमधील तुरीचा साठा आता कमी झाला आहे. आफ्रिकेतील देशांमधून आता जास्तीत जास्त दीड ते दोन लाख टन तूर आयात होऊ शकते. 

………..

देशातील दर

दुसरीकडे देशातील तूर काढणी वेगाने सुरु आहे. मात्र यंदा उत्पादन घटल्याचं शेतकरी सांगत आहेत. यंदाही गेल्यावर्षीप्रमाणं तूर आयात झाली तरी मागणीऐवढा पुरवठा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यंदा तुरीला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सध्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली मोहीम; सरकारच्या शेतकरी धोरणांवर आमदार दानवेंचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ

Girna Dam Water Release: गिरणा धरणातून टंचाई निवारणासाठी पाचवे आवर्तन

Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विमा योजनेचाच आधार

SCROLL FOR NEXT