Banana Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Banana Rate : केळी दोन हजार रुपये क्विंटल

मागील वर्षी जून-जुलै महिन्यांत केळीची लागवड कमी झाल्याचा परिणाम या वर्षी केळीच्या सर्वाधिक भावात दिसून येत आहे.

टीम ॲग्रोवन

रावेर, जि. जळगाव : कापणी योग्य केळीचे (Banana) झालेले कमी प्रमाण आणि अमरनाथ यात्रेमुळे केळीच्या मागणीत (Banana Demand) झालेल्या मोठ्या वाढीमुळे केळीच्या भावाने नवा उच्चांक (High Rates For Banana) गाठला. येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. १) केळीला २ हजार रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळाले. बाजार समितीने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील १५ दिवसांत केळीच्या भावात सव्वा तीनशे रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

मागील वर्षी जून-जुलै महिन्यांत केळीची लागवड कमी झाल्याचा परिणाम या वर्षी केळीच्या सर्वाधिक भावात दिसून येत आहे. कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे. मात्र केळीची मागणी उत्तर भारतात कायम असल्याने केळीच्या भावात रोज टप्प्याटप्प्याने सुधारणा होत आहे. १५ जूनला केळीचे भाव १६७० रुपये क्विंटल होते. तर टप्प्याटप्प्याने त्यात सुधारणा होत जाऊन केळीचे भाव शुक्रवारी २ हजार रुपये क्विंटल जाहीर झाले. प्रत्यक्षात केळीचे व्यापारी शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट दर्जाची केळी २२०० ते २३०० रुपये क्विंटल या दराने खरेदी करीत आहेत.

नेपाळमध्येही मागणी

मागील अनेक वर्षांत प्रथमच तालुक्यातील केळीची मागणी नेपाळमधील काठमांडू शहरात होत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून काठमांडूकडे ही केळी रवाना केली जात आहेत. तेथून रोज सुमारे १०० टन केळीची मागणी होत आहे.

केळी कापणी अत्यल्प

एप्रिल महिन्यात येथील बाजार समितीच्या रावेर आणि सावदा या दोन्ही उपकेंद्रांतून २०० ते २२५ ट्रक केळी भरून उत्तर भारतात रवाना होत होती. आता मात्र गेल्या आठवड्यापासून हे प्रमाण ७६ ते ९७ ट्रक म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी झाले आहे. रेल्वेने जून महिना संपूनही केळीची वाहतूक किसान रॅकने म्हणजे अनुदान देऊन सुरू न केल्याने रावेर रेल्वे स्थानकातून केळीची वाहतूक ठप्प झाली आहे, तर सावदा रेल्वे स्थानकातून अत्यल्प प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

APMC Cess Cancellation: बाजार समित्यांच्या सेस रद्दबाबत तोडगा काढू; पणनमंत्री रावल

Sugar Stock Controversy: साखरेच्या ४८ लाख टनांचा हिशेब द्या; राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सवाल

Pune Monsoon Situation: पश्चिम पुण्यात पावसाची उघडीप; पूर्व भागात प्रतीक्षा

MPSC Agriculture Service Issue: कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी करणार आंदोलन

SCROLL FOR NEXT