Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Canning Mango Price: कॅनिंगसाठी आंब्याला २८ ते ३० रुपये दर

Mango Market: सिंधुदुर्गातील कॅनिंग आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला ५५ रुपये प्रतिकिलो दर असलेला आंबा आता फक्त २८ ते ३० रुपये दराने खरेदी केला जात आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅनिंगच्या आंबा दरात मोठी घसरण झाली आहे. कॅनिंग आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून सध्या प्रतिकिलो २८ ते ३० रुपये दराने आंबा खरेदी केला जात आहे. नाशिक, पुणे आणि स्थानिक प्रक्रिया उद्योजकांनी २५ हजार टन आंबा खरेदी केल्याचा अंदाज आहे.

हंगामातील अखेरचा आंबा कॅनिंगकरिता दिला जातो. या वर्षी कॅनिंग हंगाम एप्रिल अखेरीपासून सुरू झाला. सुरुवातीला कॅनिंगच्या आंब्याला चांगला दर मिळाला. प्रतिकिलो ५५ रुपये दर होता. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी त्यामध्ये घसरण होत, तो प्रतिकिलो ४२ रुपयांवर टिकून होता. मात्र दोन दिवसांपासून त्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. अंतिम टप्प्यातील आंबा सध्या प्रतिकिलो २८ रुपये दरांनी खरेदी केला जात आहे. येत्या चार दिवसांत हा हंगाम संपण्याचा देखील अंदाज आहे.

या वर्षी आंबा उत्पादन २५ ते ३० टक्केच होते. परंतु त्याचा मोठा परिणाम कॅनिंगच्या आंब्यावर झाला नाही. कॅनिंगला मोठ्या प्रमाणात आंबा हा देवगड तालुक्यातून खरेदी केला जातो. नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि स्थानिक प्रक्रिया उद्योजक आंबा पल्पकरिता हा आंबा खरेदी करतात. या वर्षी साधारणपणे केवळ देवगड तालुक्यातून २५ हजार टन आंबा कॅनिंगला गेल्याचा अंदाज आहे.

या वर्षी आंबा उत्पादन कमी होते. मात्र त्याचा कॅनिंगवर परिणाम झालेला नाही. मी या वर्षी कॅनिंगकरिता चार हजार टन आंबा खरेदी केला. अजून एक दोन दिवस आंबा खरेदी सुरू असेल.
मंगेश वेतकर, कॅनिंग व्यावसायिक, पडेल, ता. देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT