Maize Rate in Jalgaon News
Maize Rate in Jalgaon News Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jalgaon News: खानदेशात मका आवक अल्प

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक (Maize Arrival) अल्प किंवा हवी तेवढी नसली तरी दर (Maize Rate) मात्र टिकून आहेत. किमान १८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

नवीन हंगाम किंवा आगाप रब्बी मका पिकाची (Rabi Maize Crop) मळणी एक ते दीड महिन्यानंतर होईल, अशी स्थिती आहे.

मका पीक खानदेशात बऱ्यापैकी आहे. अनेकांनी ऑक्टोबरमध्ये आगाप पेरणी किंवा लागवड केली आहे. या पिकातून महिनाभरात मळणी सुरू होईल. तसेच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मक्याची कमाल लागवड झाली आहे. या पिकातून मळणी होऊन मका आवकेस सुमारे दोन ते अडीच महिने लागतील.

मक्याची लागवड खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्टरवर झाली आहे. सर्वाधिक सुमारे २५ ते २७ हजार हेक्टर एवढी लागवड जळगाव जिल्ह्यात झाली आहे. यापाठोपाठ धुळे व नंदुरबारात लागवड आहे. सध्या बाजारात मक्याची आवक अल्प किंवा कमी आहे. कारण रब्बी हंगामातील मक्याची मळणी सुरू झालेली नाही.

काही शेतकऱ्यांनी खरिपातील मका साठवून ठेवला होता. खरिपात मक्याचे चांगले उत्पादन हाती आले. यात बऱ्यापैकी दरही मिळाले.

किमान १७०० व कमाल २२५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मक्यास ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मिळाले. सध्या दर टिकून आहेत. पण आवक कमी आहे. यामुळे या दरांचा लाभ शेतकऱ्यांना फारसा होत नसल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जामनेर व जळगाव या बाजार समित्या मक्यासाठी प्रसिद्ध आहेत. या सर्व बाजार समित्यांमध्ये रोज मिळून मक्याची ५०० ते ६०० क्विंटल आवक होत आहे.

धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथील बाजारातही मक्याची आवक कमीच आहे. तेथेही सध्या रोज मिळून ५०० क्विंटल आवक होत आहे. आवक महिनाभर शेतकऱ्यांकडून होणार नाही. यामुळे दरातही मोठी वाढ किंवा घट होत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT