Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : कोल्हापुरात बिगर हंगामी गुळाची मर्यादित आवक; दरही स्थिर

Jaggery Rate : सध्या बाजार समितीत बिगर हंगामी गुळाची आवक सुरू आहे. पंधरा दिवसांपासून गुळाचे दर ३६०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात स्थिर आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : सध्या बाजार समितीत बिगर हंगामी गुळाची आवक सुरू आहे. पंधरा दिवसांपासून गुळाचे दर ३६०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात स्थिर आहेत. गुजरातमधून फारशी मागणी नसल्याने गुजरातेतील व्यापारीही गुळाची खरेदी गरज लागेल तितकीच करत असल्याने मागणीतही फारशी वाढ नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून एप्रिलमध्ये गुळाचा हंगाम संपल्यानंतरही पुढे चार महिने गुळाची आवक होत आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागांतील गुऱ्हाळे सुरू असतात. सध्या मॉन्सून दाखल झाला असला तरी अजूनही पावसाने कुठेच जोर दिलेला नाही. संततधार पाऊस नसल्याने जिल्ह्यात मोजकी गुऱ्हाळे सुरू आहेत. गुऱ्हाळांमधूनच एक दिवसाआड गुळाची ४० ते ५० गाड्या आवक बाजार समितीत होत आहे.

एक दिवसात जरी आवक होत असली तरी आवक अत्यंत कमी आहे. केवळ एक तासात गुळाचा सौदा संपत असल्याची सध्याची स्थिती आहे. हंगामामध्ये दररोज दोन ते तीन तास सौदे सुरू असतात. सध्या गुजरातमध्ये व महाराष्ट्रात कोणताही सण नसल्याने गुळाच्या मागणीत वाढ झालेली नाही.

गुजरातमधील व्यापारी सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुजरातमधील व्यापाऱ्यांना कर्नाटकातूनही गुळाची उपलब्धता होत आहे. हा गूळ कोल्हापूरपेक्षा काहीसा स्वस्त मिळत असल्याने गुजरातमधील काही व्यापाऱ्यांनी कर्नाटकच्या गुळाला प्राधान्य दिले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीतील गूळ खरेदीसाठी व्यापाऱ्यांत स्पर्धा नाही. परिणामी दरही फारसे वाढले नसल्याचे चित्र आहे.

गेल्या महिन्याभरात गुजरातमध्ये प्रचंड उन्हाळा होता. तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होत. बाजारपेठा ओस पडल्याने तिथेही गुळाची खरेदी ग्राहकांकडून फारशी झाली नाही. उन्हाळ्यामुळे अगदी मोजकेच कार्यक्रम झाले. परिणामी याचा फटका गुळाच्या वापराला बसला.

वर्षभर गुळाची उपलब्धता

काही वर्षांपूर्वी गुळाचा हंगाम संपतेवेळी अनेक व्यापारी आपला गूळ शीतगृहासाठी खरेदी करत. यामुळे हंगामाच्या शेवटी शेवटी गुळाला चांगला दर मिळत असे. पण गेल्या दोन वर्षापासून वर्षभर गूळ मिळत असल्याने शीतगृहातील गुळाचा व्यवस्थापन खर्च टाळण्यासाठी व्यापारी मोजकाच गूळ खरेदी करत आहेत. यामुळे हंगाम संपत आला तरी दरात तेजी नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास गुळाची आवक आठवड्यातून एखादा दिवस होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT