Lemon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Rate : कळमना बाजारात लिंबाला चार- पाच हजार रुपये दर

Lemon Market : थंडीच्या कालावधीत मागणी कमी होत लिंबाचे दर २५ ते ३० रुपये किलोवर राहतात.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मृग बहर अंतिम टप्प्यात आणि हस्त बहरातील फळांच्या आवकेस अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. परिणामी, सद्यःस्थितीत बाजारात दाखल होणाऱ्या लिंबांच्या दरात चांगलीच तेजी अनुभवली जात आहे. थंडीच्या कालावधीत मागणी कमी होत लिंबाचे दर २५ ते ३० रुपये किलोवर राहतात.

परंतु मागणी आणि आवक यामध्ये तफावत असल्याने दरात वाढ होत कळमना बाजारात ४० ते ५० रुपये किलोने लिंबाचे व्यवहार होत आहेत. राज्याच्या अनेक भागांत थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे या कालावधीत लिंबाची मागणी देखील कमी होते, असा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे.

मागणी कमी झाल्यामुळे दरही दबावात येतात. यंदा मात्र दुपारच्या वेळी तापमानात होणारी वाढ आणि रात्री तसेच सकाळी थंडीचा जोर वाढता आहे. परिणामी, सद्यःस्थितीत बाजारात लिंबाची मागणी कायम असल्याचे सांगितले जाते. एकाच कारणामुळे बाजारात लिंबाचे दर वाढते असून, नागपूरच्या कळमना बाजारात आवक होणाऱ्या लिंबाला ४००० ते ५००० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे.

किरकोळ बाजारात या लिंबाची विक्री ६० ते ७० रुपये किलोने होत आहे. सध्या बाजारात मृग बहरातील लिंबू येत आहे. मृगाचा हा हंगाम अंतिम टप्प्यात असून, यापुढील काळात आठ दिवस लिंबाची उपलब्धता होईल, असे लिंबू उत्पादक तसेच व्यापारी अकुंश झंझाट यांनी सांगितले.

विदर्भातील अमरावती, वाडेगाव (अकोला) हा भाग लिंबू उत्पादकतेसाठी प्रसिद्ध आहे. या भागातूनच सर्वाधिक लिंबांची आवक होते. मृग बहर संपल्यानंतर थेट फेब्रुवारीच्या सुरुवातीला हस्त बहरातील लिंबाची आवक बाजारात होईल. त्या वेळी उन्हाळ्याचा कालावधी असल्याने मागणी अधिक राहते. परिणामी, १०० रुपये किलोचा दर सरासरी मिळतो. मात्र

या वर्षी पावसाची संततधार होती. परिणामी, हस्त बहराचा ताण लवकर तुटल्याने हस्त बहरातील लिंबाचे दर १५० रुपये किलोच्या पुढे गेले होते.

महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्ली परिसरात थंडी पंधरा दिवसांनी उशिरा पडते. त्यामुळे दिल्ली बाजारात लिंबाला मागणी आणि दरही चांगला आहे. सध्या दररोज तीन ते चार टन मालाचा पुरवठा दिल्ली बाजारात केला जात आहे. ५००० ते ८००० रुपये क्‍विंटल (५० ते ८० रुपये किलोचा) दर मिळत आहे.
अंकुश झंझाट, शेतकरी तसेच व्यापारी, रा. माहूली चोर, ता. नांदगाव खंडेशवर, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT