Urad Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Urad Import: उडदाच्या आयातीत मोठी वाढ; दर नरमतील का?

Urad Production : देशात यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली. सध्या उडदाचे भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात भाव वाढल्याने आयातही वाढली.

Team Agrowon

Urad Crop : पुणेः देशात यंदा उडदाच्या उत्पादनात (Urad Production) मोठी घट झाली. त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली. सध्या उडदाचे भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात भाव वाढल्याने आयातही वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांमध्ये गेल्यावर्षीच्या एकूण आयातीपैकी जास्त उडीद बाजारात आला.

देशात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव तेजीत आहेत. गेल्या खरिपात आणि रब्बी हंगामात उडदाचे उत्पादन कमी झाले होते. उडदाचे उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पण दुसरीकडे देशातील मागणी टिकून होती. आयात वाढूनही उडदाच्या पुरवठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे देशातील उडदाचे भाव जानेवारी महिन्यापासून तेजीत आहेत. रब्बी हंगामातील माल बाजारात आल्यानंतरही हमीभावापेक्षा जास्त दर होता.

देशात उडदाचा तुटवडा असल्याने यंदा आयात वाढणार हे स्पष्ट होते.  त्यानुसार चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात देशात एक लाख टन उडीद आयात झाली.

विशेष म्हणजे मागीलवर्षी म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामात देशात केवळ ७६ हजार ३५५ टन उडीद आयात झाला होता. म्हणजेच यंदा तीनच महिन्यात गेल्या संपूर्ण वर्षातील एकूण आयातीपेक्षा जवळपास २५ हजार टनांनी जास्त झाली. तर २०२१-२२ च्या तुलनेत आयातीत २३ हजार टनांनी वाढ झाली.

यंदाच्या तीन महिन्यांचा विचार करता जून महिन्यातील आयात सर्वाधिक होती. जून महिन्यात तब्बल ४५ हजार टन आयात झाल्याचा अंदाज आहे. तर मे महिन्यात जवळपास ३२ हजार टनांची आयात झाली. एप्रिल महिन्यात यंदाची सर्वात कमी म्हणजेच २५ हजार टनांची आयात झाली, अशी माहिती आहे. 

भारताला सर्वाधिक उडीद निर्यात म्यानमार करत असतो. सध्या म्यानमारमध्ये उडदाचा चांगला स्टाॅक उपलब्ध आहे.

म्यानमारमध्ये उडादाचे नवे पीक पुढील काही महिन्यांमध्ये येईल. त्यामुळे म्यानमार जुना स्टाॅक बाहेर काढू शकतो. असे झाल्यास भारतात उडदाची आयात वाढेल. पण देशात पुरवठा कमी असल्याने उडदाचे भाव कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

Well Repair Subsidy: अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना मिळणार विहीर दुरुस्तीचे अनुदान

Alphanso Mango Crisis: हापूस आंब्याचा हंगाम संकटात

Gas Theft Case: गॅस चोरीप्रकरणी १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त

SCROLL FOR NEXT