Kheda Kharedi Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Kheda Kharedi : खानदेशात खेडा खरेदी रखडत

Cotton Market : खानदेशात कापूस दरांवर दबाव असून, आवक सध्या प्रतिदिन 30 हजार क्विंटल एवढी आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापूस दरांवर दबाव असून, आवक सध्या प्रतिदिन 30 हजार क्विंटल एवढी आहे. दर 6800 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल, असा खेडा (थेट) खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.

शासकीय कापूस खरेदी खानदेशात सुरू झाली आहे. परंतु शासकीय खरेदीला हवा तसा प्रतिसाद नाही. कारण खरेदी केंद्रात कापूस नेण्यासाठी वाहूतक भाडे द्यावे लागते. शासकीय दर 7020 रुपये प्रतिक्विंटल असा आहे. यामुळे शेतकरी खेडा खरेदीत कापसाची विक्री करणे पसंत करीत आहेत.

कापसाची आवक सध्या प्रतिदिन 30 हजार क्विंटल एवढी आहे. ही आवक मागील वर्षाच्या तुलनेत बरी आहे. परंतु मध्यंतरी पावसामुळे ही आवक रखडत सुरू होती. परंतु पाऊस थांबल्याने मागील दोन दिवसांपासून खानदेशात खरेदी सुरू झाली आहे.

कापसाची पाठवणूक मध्य प्रदेश, गुजरात व स्थानिक जिनींग प्रेसिंग कारखान्यांत केली जात आहेत. कारखानदार, मोठे व्यापारी एजंटच्या मदतीने खरेदी करीत आहेत. सध्या कापसाची आवक धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, जामनेर भागात आवक बऱ्यापैकी आहे. परंतु इतर भागात आवक कमी आहे.

दरात घसरण

खानदेशात कापसाचे दर मागील पंधरवड्यात 7000 ते 7100 रुपये प्रतिक्विंटल, असे खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत होते. परंतु दरात मागील काही दिवसांत घसरण झाली आहे. यंदा कापसाचा दर्जा चांगला आहे.

पण दर कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. किमान साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना हवा आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT