Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Katraj Milk Rate : कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात आजपासून वाढ

पशुखाद्याचे वाढलेले दर तसेच इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

Team Agrowon

पुणे : पशुखाद्याचे (Animal Feed) वाढलेले दर तसेच इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक (Milk Producer) शेतकरी अडचणीत आला आहे. या स्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Katraj Milk) संघाने आजपासून (ता. १) गाय दूध खरेदी दरात प्रति लि. २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

संघाचे संचालक मंडळाच्या सभेमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. बुधवारपासून (ता. १ फेब्रुवारी) गाय दूध (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी) खरेदी दर प्रति लि. वरकड खर्चासह संस्थांसाठी रु. ३७.८० असेल.

दूध खरेदी दरात वाढ करावी लागत असल्याने कात्रज दुधाच्या विक्री दरातदेखील वाढ करण्यात येत असून आजपासून टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दुधाच्या दरात प्रति लि. प्रत्येकी २ रुपयांनी दरवाढ करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थांनी संघास दुधाचा जास्तीत जास्त पुरवठा करावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT