Jaggery Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे बंदच

गुळाच्या ३ हजार ७०० रुपयांच्या पुढे भाव द्यावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली, तर गुळाच्या प्रतवारीनुसार आम्ही भाव देऊ अशा भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. यामुळे सौदे बंदच राहिले.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः गुळाच्या ३ हजार ७०० रुपयांच्या पुढे भाव (Sugar Rate) द्यावा, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली, तर गुळाच्या (Jaggery Market) प्रतवारीनुसार आम्ही भाव देऊ अशा भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. यामुळे सौदे (Jaggery Deals) बंदच राहिले.

दोन्ही घटकांनी बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप यांच्या व सचिव जयवंत पाटील यांच्या समोर आपल्या मागण्या केल्या. मात्र अंतिम निर्णय झाला नाही. परिणामी, बाजार समितीत गुळाची आवक झाली मात्र सौदे होऊ शकले नाहीत.

त्यामुळे गूळ सौद्याचा पेच गुरुवारी (ता. २४) तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. सकाळी अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत गूळ आणला मात्र व्यापारी सौदेस्थळी आले नाहीत त्यांनी शाहूपुरी व्यापारी असोसिएशनमध्ये बैठक घेतली.

त्यानंतर व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ बाजार समितीचे प्रशासक श्री. जगताप यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनीही प्रशासक श्री. जगताप यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या, पण दुपारपर्यंत तोडगा निघू शकला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT