Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : साखर विक्रीचा कोटा वाढवल्यामुळे ‘इस्मा’ची नाराजी

केंद्र सरकारने सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर सप्टेंबर महिन्यात स्थानिक बाजारातील साखर विक्रीचा कोटा वाढवून दिला आहे. या निर्णयाबाबत ‘इस्मा’ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : केंद्र सरकारने सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर सप्टेंबर महिन्यात स्थानिक बाजारातील साखर विक्रीचा कोटा (Domestic Market Sugar Sale Quota) वाढवून दिला आहे. या निर्णयाबाबत ‘इस्मा’ने (ISMA) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत ‘इस्मा’चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी अन्न मंत्रालय सचिवाना पत्र लिहून उद्योगाची नाराजी कळवली आहे. ऑगस्ट महिन्याचा देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा २२ लाख टनांचा होता. सप्टेंबरमध्ये तो २३.५० लाख टन करण्यात आला. केंद्राने या अगोदरच जुलैचा कोटा ३१ ऑगस्टपर्यंत विक्री करण्याची मुदत वाढवली होती.

एकीकडे दिलेल्या महिन्यातील साखर कोटा विक्री होत नाही म्हणून तो कोटा दुसऱ्या महिन्यापर्यंत वाढवून देण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारने मात्र सप्टेंबर महिन्यात दीड लाख टनांचा अतिरिक्त कोटा दिला आहे. हे अनाकलनीय आहे. सरकार जादा साखर कोटा विक्रीसाठी देत असल्याने कारखान्यावर विक्रीसाठीचा दबाव येत असल्याचे श्री. झुनझुनवाला यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान केंद्रीय अधिकाऱ्यांनी मात्र सणासुदीच्या काळामध्ये साखर मागणी वाढेल या हेतूने हा कोटा वाढवून दिल्याचे म्हटले आहे. कारखान्यांना जास्तीत जास्त साखर विक्री करता यावी, यासाठी कोटा वाढवून दिला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात २४.५० लाख टनांचा साखर कोटा केंद्राने दिला होता. या तुलनेत हा कोटा कमीच असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

Railway Infrastructure Expansion: माल वाहतुकीसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार : पुनीत अग्रवाल

Shepherd Migration: मेंढपाळांची दसऱ्यापूर्वीच भटकंती

Farmers Support: शेतकऱ्यांना संवादातून आधार

Fodder Conservation Campaign: चारा साक्षरतेसाठी गावपातळीवर जनजागृती, प्रशिक्षण मोहीम

SCROLL FOR NEXT