Cotton Bales Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Production : देशात कापूस उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहणार

Cotton Industry India : एचडीपीएस (हाय डेन्सिटी प्लॅटिंग सिस्टीम) लागवड तंत्रज्ञानामुळे देशात कापूस उत्पादकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच देशात यंदा ३०० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तविला जात असताना ही उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहील.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : एचडीपीएस (हाय डेन्सिटी प्लॅटिंग सिस्टीम) लागवड तंत्रज्ञानामुळे देशात कापूस उत्पादकता वाढीस लागली आहे. त्यामुळेच देशात यंदा ३०० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज वर्तविला जात असताना ही उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहील, असा दावा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केला आहे.

‘ॲग्रोवन’शी बोलताना डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘सिंचन सुविधांमुळे देशात कापूस उत्पादकतेत गुजरात राज्याची आघाडी राहते. मात्र २०२४-२५ या वर्षातील खरीप हंगामाच्या सुरुवातीला गुजरातमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. राजकोट, मोरंबी या जिल्ह्यांत ७०० मिलिमीटर पावसाची एका आठवड्यात नोंद झाली. त्यामुळे गुजरात यंदा कापूस उत्पादकतेत पिछाडीला आहे.

परंतु त्याचा देशाच्या एकूण उत्पादकतेवर फार परिणाम झाला नाही. सध्या देशाची उत्पादकता ३०० लाख गाठ होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु अतिसघन कापूस लागवड प्रकल्पातील वाढीव उत्पादनाचा अंदाज घेता देशाची एकूण उत्पादकता ३२५ लाख गाठींवर राहील. कापसाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सनियंत्रणात देशातील आठ राज्यात अतिसघन कापूस लागवड प्रकल्प राबविण्यात आला.

त्यातील १२,५०० हेक्‍टर क्षेत्र अतिसघन कापूस लागवडीखालील, तर २ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लांब धाग्याच्या कापूस वाणाची लागवड करण्यात आली होती. प्रकल्पाच्या निरीक्षणांती महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना प्रति एकर १० ते १५ क्‍विंटल अशी उत्पादकता मिळाली आहे. राजस्थानमध्ये एकरी १३ ते १४ क्‍विंटल अशी उत्पादकता मिळाली आहे. राजस्थानमधील बासंवाडा जिल्ह्यात महिलांनी कापूस शेतीचे व्यवस्थापन केले. राजसमंद, चित्तोडगड या जिल्ह्यांनी देखील कापूस उत्पादकतेत आघाडी घेतली आहे.

अकोला जिल्ह्यात ५० हजार हेक्‍टरवर अतिसघन लागवड

दरम्यान, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात ५० हजार हेक्‍टरवर अतिसघन कापूस लागवड केली जाणार आहे. त्याकरिता निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. या माध्यमातून कापूस उत्पादकता वाढीसाठी देशाअंतर्गंत मॉडेल विकसित केले जाणार आहे. उत्पादकता वाढीचा आराखडा त्यानंतरच्या काळात देशभरात मांडला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुजरातमध्ये कापूस हंगामाच्या सुरुवातीला एका आठवड्यात ७०० मिमी इतक्‍या पावसाची नोंद झाली. त्याचा परिणाम कापूस उत्पादकतेवर झाला असला तरी देशाच्या इतर भागांत कापसाची उत्पादकता चांगली आहे. राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांनी त्यात आघाडी घेतली आहे.
डॉ. वाय.जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT