Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar : साखरेच्या ‘एमएसपी’त वाढ करा ः इस्मा

उसाच्या एफआरपीत वाढ केल्यानंतर आता साखर उद्योगानेही साखरेचे किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवावी, अशी मागणी केली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : उसाच्या एफआरपीत (Sugarcane FRP) वाढ केल्यानंतर आता साखर उद्योगानेही (Sugar Industry) साखरेचे किमान आधारभूत किंमत (Sugar MSP) (एमएसपी) वाढवावी, अशी मागणी केली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) (इस्मा) ने केंद्र सरकारला साखरेची एमएसपी सध्याच्या ३१ रुपये प्रति किलोवरून किमान ३६ ते ३७ रुपये प्रति किलोपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे.

साखरेच्या एमएसपीची शेवटची घोषणा फेब्रुवारी २०१९ मध्ये करण्यात आली होती. अन्न मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात, ‘इस्मा’चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी म्हटले आहे, की सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये साखरेचा एमएसपी ३१ रुपये प्रति किलो ठरवली होती, जेव्हा उसाची एफआरपी प्रति क्विंटल २७५ रुपये होती. २०१९ पासून आतापर्यंत उसाची एफआरपी सातत्याने वाढली आहे.

साखर कारखान्यांचा ८५ टक्के महसूल हा साखरेच्या विक्रीतून येतो आणि शेतकऱ्यांना उसाची किंमत देण्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. कर्जावरील व्याजाचा खर्च, प्रकल्प आणि यंत्रसामग्रीचे घसारा आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे साखरेचा धंदा तोट्यात येत आहे. किमान विक्री मूल्यात वाढ नसल्याने साखर कारखानदारीला सातत्याने तोट्याला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना आता एफआरपीत वाढ केलेलीच आहे याचप्रमाणे साखरेच्या किमान विक्री मूल्यातही वाढ करावी, अशी आमची मागणी असल्याचे ‘इस्मा’ने पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT