Sugarcane cultivation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugarcane Cultivation : देशात ऊस लागवडीत सव्वा लाख हेक्‍टरनी वाढ

Sugarcane Season : देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागवड सुमारे सव्वा लाख हेक्‍टरनी वाढली आहे. ८ जुलैअखेर देशात ५६.८८ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागवड सुमारे सव्वा लाख हेक्‍टरनी वाढली आहे. ८ जुलैअखेर देशात ५६.८८ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत देशात ५५.४५ लाख टन उसाची लागवड झाली होती.

यंदा चांगल्या मॉन्सूनचा अंदाज व्यक्‍त केल्याने व काही ठिकाणी वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकरी उसाची लागवड करीत आहेत. केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील तीन आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या महिन्याच्या कालावधीत बऱ्यापैकी पाऊस झाला.

गुजरात, तमिळनाडू, बिहार, पंजाब, हरियाना, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये मॉन्सूनच्या चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकरी उसाची लागवड करत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या पुढे असून हवामान व मॉन्सूनची परिस्थिती अनुकूल राहिल्यास त्याचा सरासरी उतारा आणि साखरेचा सरासरी रिकव्हरी दर सुधारण्याची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी उसाची लागवड जुलैच्या उत्तरार्धात फारशी वाढली नाही. देशात विविध राज्यांमध्ये विविध कालावधीत उसाची लागवड केली जाते. उसाची लागवड होताना पावसाचे प्रमाण पाहिले जाते. विशेष करून महाराष्ट्रामध्ये पावसाळी हवामानात जुलै ते ऑगस्टमध्ये ७५ टक्के ऊस लागवड केली जाते.

कर्नाटकात गेल्या दोन महिन्यांत मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने रखडलेल्या ऊस लागवडीला काहीशी गती आहे. महाराष्‍ट्रातही आगामी काळात पावसाची चांगली शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात पाऊस झाल्यास महाराष्ट्रात आडसाली लागवडीही वाढतील, असा अंदाज आहे.

मॉन्सूनवर भवितव्य अवलंबून

देशात वर्षभर ऊस लागवडी सुरू असल्या तरी मॉन्सूनचे चार महिने हे वर्षाच्या ऊस लागवडीसाठी महत्त्वाचे ठरतात. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्यास हिवाळी व उन्हाळी हंगामात भूगर्भातील जलस्रोत चांगला रहातो. विहिरी व कूपनलिकांना पाणी पुरेसे असल्यास जानेवारी ते मार्च पर्यंतही ऊस लागवडी वेगात सुरु होऊ शकतात.

महाराष्‍ट्रासारख्या ठिकाणी ऊस तुटल्यानंतर पुरेसे पाणी असल्यास लगेच दुसऱ्‍या हंगामातील लागवडी होतात. यामुळे येत्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम पुढील दोन तीन महिन्यावर होऊ शकतो. यामुळे ऊस लागवडीत आणखी वाढ अपेक्षित असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT