Ginger Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginger Rate : आल्याच्या दरात तीन ते चार हजार रुपयांनी सुधारणा

आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रतिगाडीस तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होऊन प्रतिगाडी (५०० किलो) कमाल १८ ते १९ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

विकास जाधव 

सातारा ः आले पिकाच्या दरात (Ginger Rate) सुधारणा होऊ लागली आहे. सध्या आल्याच्या प्रतिगाडीस तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होऊन प्रतिगाडी (५०० किलो) कमाल १८ ते १९ हजार रुपयांपर्यंत दर (Ginger Market Rate) मिळत आहेत. पुढील काळात दरात सुधारणा होणार असल्याचे संकेत तज्ज्ञांकडून मिळत आहेत. दरातील सुधारणेमुळे आले उत्पादक (Ginger Producer) शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.

राज्यभरात १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावर आले पिकाची लागवड होते. यामध्ये सातारा जिल्ह्यात साधारणपणे २२०० ते २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. यामध्ये सर्वाधिक कोरेगाव, सातारा, कराड, खटाव तालुक्यांत लागवड होते. मागील चार वर्षांत आले पिकाच्या दराने नीचांकी पातळी गाठली होती. यामुळे आले उत्पादक अडचणीत आले होते. मागील चार ते पाच वर्षांपासून आले पिकाच्या दरात संथगतीने का होईना सुधारणा सुरू झाली आहे.

सध्या प्रतिगाडीमागे तीन ते चार हजार रुपयांनी सुधारणा झाली आहे. सध्या आले पिकास प्रतिगाडी कमाल १८ ते १९ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पावसामुळे आले काढणी ठप्प झाली होती. अति पावसामुळे आले पिकावर मुळकुजाचा प्रार्दुभाव वाढल्याने आले पीक काढून टाकावे लागले आहे. एकूण क्षेत्राच्या २० टक्के आले पीक काढले गेले आहे.

दरातील घसरणीमुळे क्षेत्रातही मोठी घट झाल्याने एकूणच आले पिकाचे क्षेत्र कमी शिल्लक आहे. यामुळे दरात आणखी सुधारणा होण्याचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आले काढणीची घाई करू नये. मागील चार ते पाच वर्षांपासून आले उत्पादक विविध कारणांनी अडचणीत आला आहे. सध्या मिळणारे दर काही प्रमाणात का होईना दिलासा देणारे आहेत; मात्र किडी, रोगांमुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे.

बियाणे होणार महाग

जिल्ह्यात मे महिन्यापासून आले लागवड सुरू होते. या काळात सुरू असलेल्या दरात चार ते पाच हजार रुपये अधिक दर बियाण्यास मिळत असतो. मागील वर्षी आठ ते १२ हजार रुपये दराने बियाणे विक्री झाली होती. या वर्षी बियाण्याचे दर प्रतिगाडी २० ते २५ हजार रुपयांदरम्यान जाण्याची शक्यता आहे. खते, औषधे तसेच मशागतीचे वाढलेले दर व बियाण्याचे दर यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ होणार आहे.

कन्नडमध्ये २० ते २१ हजार

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे आल्यास प्रतिगाडीस कमाल २० ते २१ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मागील दोन महिन्यांच्या तुलनेत दरात गाडीमागे चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे कन्नड येथील प्रगतिशील शेतकरी संदीप राठोड यांनी सांगितले.

अतिपावसामुळे अनेक आले प्लॅाट खराब झाले आहेत. आले खराब होत असेल तर शेतकऱ्यांनी काढावे; मात्र आले प्लॅाट निरोगी असतील तर ते बियाण्यांसाठी ठेवावेत किंवा खोडवा पिके घ्यावीत. पुढील काळात दर वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मनोहर साळुंखे, कृषिभूषण शेतकरी, नागठाणे, जि. सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT