Moong, soybean, Tomato Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : मूग, सोयाबीन, टोमॅटोच्या आवकेत वाढ

Soybean Rate : खरीप पिकांसाठी हमीभाव पुढील काही दिवसात जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. मुगाची आवक सुरू झाली आहे.

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- ८ ते १५ जून, २०२४

खरीप पिकांसाठी हमीभाव पुढील काही दिवसात जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. मुगाची आवक सुरू झाली आहे. वाढत्या आवकेमुळे मुगाच्या किमती एप्रिलपासून उतरत आहेत. आता त्या हमीभावापेक्षा कमी झाल्या आहेत. सोयाबीनच्या किमती घसरत असल्याने सोयाबीन बाजारात वाढत्या प्रमाणात येत आहे.

टोमॅटोची आवकसुद्धा वाढत आहे. इतर वस्तुंची आवक कमी होत आहे. कापसातही उतरता कल कायम आहे. हरभरा, तूर, टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. या पुढील काळात शेतीमालाच्या किमती खरीप पावसाच्या प्रगतीवर अवलंबून असतील.

१४ जून रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५६,२०० वर आले होते. या सप्ताहातसुद्धा ते ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ५५,९६० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव १.१ टक्क्यांनी घसरून रु. ५६,२०० वर आले आहेत. सप्टेंबर फ्युचर्स भाव रु. ५९,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.४ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.२ टक्क्यांनी वाढून रु. १,४४६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात रु. २,२२० वर स्थिर आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,२३६ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत. पुढील महिन्यांसाठी व्यवहार अजून सुरू झाले नाहीत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १८,०९७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ०.४ टक्क्यांनी वाढून रु. १८,१७५ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर्स किमती रु. १८,१८० वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १८,८४२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ३.७ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर स्थिर आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,३५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता वाढू लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ११,३४१ वर आली होती. या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी घसरून रु. ११,१३९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबर पासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,१९६ होती; या सप्ताहात ती रु. २,५२० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,४५० वर आली होती. या सप्ताहात रु. २,५०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT