फ्यूचर्स किमती ः सप्ताह २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३
१ डिसेंबरपासून NCDEX मध्ये मक्यासाठी १९ एप्रिल डिलिव्हरी व हळदीसाठी २० जून डिलिव्हरीचे व्यवहार सुरू झाले. त्यामुळे NCDEX मध्ये आता मक्यासाठी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व एप्रिल डिलिव्हरी तर हळदीसाठी डिसेंबर, एप्रिल व जून डिलिव्हरीचे व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसासाठी फक्त जानेवारी डिलिव्हरीचे तर कपाशीसाठी फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीचे व्यवहार चालू आहेत.
सध्या कापूस, मका, सोयाबीन यांची आवक वाढती आहे. कांदा आणि टोमॅटो यांची आवक कमी झाली आहे. १ ऑक्टोबरपासून कापसाच्या किमती उतरत आहेत. तुरीच्या किमतीतील वाढ थांबली आहे. मका, कांदा व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. सोयाबीनमध्ये सुद्धा दरवाढीचा कल आहे.
१ डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. ५६,४४० वर आले होते. या सप्ताहात ते १.१ टक्क्याने घसरून रु. ५५,८०० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव ०.४ टक्क्याने घसरून रु. ५७,२४० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून रु. १,४४० वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५७८ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ९.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,१७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. २,१८० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जानेवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२०१ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२२८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची देशातील आवक वाढती आहे; पण मागणीसुद्धा वाढत आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १३,४०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. १३,४६७ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. १५,१३२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १२.४ टक्क्यांनी जास्त आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात २.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,००० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,७२५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,३०३ वर आली होती. या सप्ताहात ती ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,१०१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) या सप्ताहात १ टक्क्याने कमी होऊन रु. १०,१६२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. गेल्या दोन महिन्यांत तुरीच्या किमती वाढत होत्या; मात्र त्या सध्या स्थिर होत आहेत.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ३,४२० होती; या सप्ताहात ती रु. ३,९२० वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० होती; या सप्ताहात ती रु. १,९४० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.