Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : खानदेशात केळीदरात सुधारणा

Khandesh Banana Market : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांत केळी दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १८५० ते १८६० रुपये असे आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांत केळी दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. दर प्रतिक्विंटल १००० ते १८५० ते १८६० रुपये असे आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात किमान १४२२ ते २२११ रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळीची आवक अतिपावसाने मुक्ताईनगर, रावेर, यावल भागात कमी झाली आहे.

सध्या प्रतिदिन ९५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची जळगाव जिल्ह्यात आवक होत आहे. तसेच धुळे व नंदुरबारात मिळून २० ते २२ ट्रक केळीची आवक होत आहे. केळीची आखातातील निर्यात आणखी घटली असून, सध्या प्रतिदिन चार कंटेनर केळीची पाठवणूक धुळे, नंदुरबार भागातून होत आहे. केळीला उठाव कायम आहे. परंतु आवक आणखी पाच ते सात ट्रकनी घटली आहे.

यामुळे केळीच्या दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणा झालेली दिसत आहे. किमान दरही १००० रुपयांवर आहेत. सध्या नवती केळीमधील आवक कमी आहे. जुनारी (केळीची ८० ते ९० टक्के काढणी पूर्ण झालेली बाग) व पिलबाग (खोडवा) केळीमधून काढणी सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगर, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात पिलबाग व जुनारी केळी अधिक आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव व जामनेरातही जुनारी केळीमधून आवक सुरू आहे. केळीला उत्तर भारतातून मागणी येऊ लागली आहे. फक्त काश्मीरातील केळीची पाठवणूक सुरळीत नाही. परंतु उत्तर प्रदेश, राजस्थान येथे पाठवणूक सुरळीत आहे. कमी दर्जाच्या केळीची छत्तीसगड, राज्यातील नागपूर, कल्याण, ठाणे, नवी मुंबई भागांत पाठवणूक होत आहे.

उत्तर भारतात ७० ते ८० ट्रक पाठवणूक सुरू आहे. दिल्ली येथील पूरस्थिती दूर होत आहे. परंतु केळीची मॉल, हातविक्रीला सध्या काहीशी अडचण आहे. यामुळे दिल्ली येथील पाठवणूक अल्प किंवा कमी आहे.

मध्य प्रदेशात पिकाला पुराचा फटका

केळीची आवक मागील आठवड्यात कमी झाली. ही आवक पुढेही आणखी काहीशी कमी होऊ शकते. मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. भोकरी व इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच पुरामुळे अनेकांचे केळी पीक वाहून गेले आहे. यामुळे बऱ्हाणपुरात केळी दरात चांगली वाढ मागील आठवड्याच्या अखेरीस झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT