Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाचे दर चालू महिन्यात कसे राहतील ?

देशातील कापूस दर यंदाच्या उचांकी दरापासून सध्या नरमलेले आहेत. शिवाय कापूस दरात चढ उतारही सुरु आहेत.

Anil Jadhao 

देशातील कापूस दर (Cotton Rate) यंदाच्या उचांकी दरापासून सध्या नरमलेले आहेत. शिवाय कापूस दरात चढ उतारही सुरु आहेत. या परिस्थितीत सुताला मागणी कमी असल्याने सूतगिरण्यांनी (Spinning Mills) सवलतीत विक्री सुरु केली. पण तरीही सूतगिरण्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं जातं.

सध्या देशात सुताचे दर कमी झालेले आहेत. मात्र तरीही कापड उद्योगाकडून सुताला कमी उठाव असल्याने देशातील सूतगिरण्यांकडे सुताचा मोठा साठा पडून असल्याचे सांगितले जात आहे. हा साठा बाहेर काढण्यासाठी सूतगिरण्या प्रयत्न करत आहेत. सूतगिरण्या मोठ्या खरेदीदारांना सवलतही देत आहेत. मात्र तरीही सुताला मागणी अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. एक तर सुताचे दर कमी झाल्यानंतर मागणी वाढले किंवा कापड बाजारात चैतन्य आल्यानंतर सुताला मागणी येईल, असंही सांगितलं जात आहे. 


मात्र सुताचे दर हे कापसाच्या दरावर थेट अवलंबून असतात. चालू हंगामात नोव्हेंबर महिन्यात कापूस दरात ९ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र सध्या दर ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाचे दर नरमले तशी बाजारातील कापूस आवकही कमी झाली. देशातील बाजारात एरव्ही दैनंदीन सरासरी दोन ते सव्वादोन लाख गाठींच्या दरम्यान आवक असते. मात्र सध्या केवळ एक ते एक लाख १० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे.

दर कमी झाल्यामुळे या दरात कापूस विकण्यास शेतकरी तयार नाहीत. अपेक्षित दर मिळाल्यानंतरच कापूस विकू, असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे कापसाचे दर जास्त नरमले नाहीत. देशातील कापूस दर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत. तसंच शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीवरच कापसाचे दरही टिकून असल्याचे जाणकारांनी सांगितले.

बाजारात या परिस्थितीत कापसाची आवक वाढल्यास दर दबावात येऊ शकतात. मात्र शेतकऱ्यांनी कापसाची मर्यादीत विक्री केल्यास दर टिकून राहतील. चालू महिना कापूस बाजारासाठी खूप महत्वाचा आहे. डिसेंबरमध्ये कापूस दरात चढ उतार होऊ शकतात. मात्र बाजारातील आवक कमी राहील्यास पुढील महिन्यात कापूस दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT