Jaggery Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Market : कऱ्हाड बाजार समितीत गुळाला उच्चांकी दर

Jaggery Rate : आजच्या सौद्यांमध्ये ४४८ क्विंटल गुळाची बिक्री होऊन गुळाला सरासरी भाव चार हजार १०० रुपये मिळाला.

विकास जाधव 

Satara News : कऱ्हाड (जि. सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या गुरुवारी (ता. १६) झालेल्या सौद्यात कोतोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी अरुणकुमार दौलू पाटील यांच्या गुळाला उच्चांकी ६ हजार ८०० रुपये तर पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी निखिल मारुती नलवडे यांच्या गुळाला ६ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुळाचे मोठ्या प्रमाणात सौदे होतात. यंदाही ते सुरू आहेत. येथील गुळाला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान येथून मागणी असते. त्यामुळे गुळाची उलाढालही मोठ्या प्रमाणात होते. बाजार समितीत गुरुवारी झालेल्या सौद्यातील गुळाची आवक मे. शिवतेज ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानांत झाली होती.

सौद्यावेळी मार्केट यार्डमधील खरेदीदार व्यापारी मे. ए. एफ. ट्रेडर्स व मे. डी. के. ब्रदर्स यांनी गूळ खरेदी केला. आजच्या सौद्यांमध्ये ४४८ क्विंटल गुळाची बिक्री होऊन गुळाला सरासरी भाव चार हजार १०० रुपये मिळाला. निखिल नलवडे या शेतकऱ्याचा सत्कार बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते झाला.

या वेळी बाजार समितीचे संचालक जयंतीलाल पटेल, शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे मालक उत्तमराव जाधव, बाजार समितीचे प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, संतोष पवार, दिलीप पाटील, सचीन पवार, संपत बडेकर, भाजीपाला मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष वसंतराव आळंदे, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कऱ्हाड बाजार समिती गुळाच्या सौद्यांसाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी रसाळ, कणीदार, चिक्की स्वरूपाचा, भेसळरहीत गूळ तयार करून मार्केट यार्डवर विक्रीस आणावा. गुळाला चांगला दर मिळत आहे.
- विजयकुमार कदम, सभापती, बाजार समिती कऱ्हाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT