Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : वाईत हळदीला उच्चांकी १९ हजार २०० रुपये दर

Turmeric Rate : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६०० पोती नवीन हळदीची आवक झाली.

Team Agrowon

Satara News : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६०० पोती नवीन हळदीची आवक झाली. त्यास क्विंटलला १६ हजार ते १९ हजार २०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला.

हळदीच्या लिलावाचा प्रारंभ गुरुवारी (ता. ८) किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, ॲड. उदयसिंह पिसाळ, आत्माराम सोनवणे, शिवाजीराव पिसाळ, शंकर शिंदे, कांतिलाल पवार, लक्ष्मण पिसाळ, दीपक बाबर, शिवाजी जमदाडे आदींच्या हस्ते करण्यात आला.

सभापती मोहन जाधव म्हणाले, ‘‘भाजी मंडईतील शिस्त, स्वच्छता राखण्याचे काम शेतकरीच करतात. शेतकरी स्वतः माल विकतात अशी मंचरनंतर वाईची एकमेव बाजार समिती आहे. या वर्षी हळदीला दर असल्यामुळे शेतकऱ्यांना अन्य बाजारपेठेत जायला लागूच नये, असा दर व्यापाऱ्यांनी द्यावा.’’

प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या वतीने वसंत जमदाडे यांनी अडचणी मांडल्या. संचालक रमेश गायकवाड, रवींद्र मांढरे, नाना शिंदे, दत्तात्रेय बांदल, पोपट जगताप, राहुल वळकुंदे, तानाजी कचरे, शकुंतला सावंत, संजय मोहोळकर, सचिन फरांदे, सचिव राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

विश्‍वजित पिसाळ, प्रल्हाद गाढवे, राजेंद्र सोनावणे, विक्रम वाघ, रेखा जगताप, व्यापारी रवी कोरडे, कांतिलाल जैन, साहेबराव शेलार, मदन ओसवाल, कन्हय्या गांधी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. उपसभापती विलास येवले यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unregistered Pesticide Advertisement: बेकायदेशीर तणनाशकाची भारतात ऑनलाइन विक्री

GIS Watershed Maps: सूक्ष्म पाणलोट नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध

Cotton Industry: जिनिंग व्यावसायिकांनी शेतकरी हिताला प्राधान्य द्यावे : मंत्री गिरिराज सिंह

Agrowon Sarpanch Mahaparishad: गावाच्या विकासाचा ‘अजेंडा’ ठरवा; केवळ हार-तुऱ्यांत अडकू नका !

Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह, वादळी पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT