Groundnut Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Groundnut Market : दोंडाईचा बाजार समितीत भुईमुगाचे भाव गडगडले

Groundnut Rate : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगांचे भाव अचानक गडगडल्याने शेतकऱ्यांच्या संताप व्यक्त केला गेला.

Team Agrowon

Dhule News : दोंडाईचा (ता. शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगांचे भाव अचानक गडगडल्याने शेतकऱ्यांच्या संताप व्यक्त केला गेला. शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीच्या कार्यालय गाठले. दोन तास लिलाव प्रक्रिया रखडली. बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये मध्यस्थी करत चर्चा घडवून आणत शेंगा खरेदीची प्रक्रिया सुरू केली.

खुला बाजार, वाढलेली भुईमूग शेंगांची आवक यामुळे प्रतिक्विंटलच्या साडे सात हजार रुपयांवरून साडेसहा हजार भाव दिले गेले. तब्बल एक हजार रुपयाने भाव घसरले त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात ओली, कोरडी शेंगासाठी साडेसात हजारांपर्यंत भाव दिला गेला.

शनिवार, रविवार या सुट्टीच्या दोन दिवसांत प्रतिक्विंटलच्या मागे एक हजार रुपये भाव कमी दिला जात होता. नेहमीप्रमाणे लिलावाला व्यापाऱ्यांनी सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना उफाळून आल्या.

पेरणीपासून ते उत्पादन येईपर्यंत खर्चही निघणार नाही, अशी व्यथा मांडली गेली. अखेर खरीप हंगामासाठी हातात भांडवल नाही. मिळेल त्या भावात हताशपणे शेंगा विक्री कराव्या लागत आहेत, असे शेतकरी म्हणतात.

आवक वाढली

शंभर सव्वाशे वाहने एवढ्या भुईमूग शेंगा दोंडाईचा येथे विक्रीसाठी येत आहेत. सध्या आवक अधिक आहे. शेंगांमध्ये माती येते. दोन दिवसांपूर्वी सर्वत्र भाव कमी झाले आहेत. पण शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली पाहिजे असे.

अरेरावी करू नका असे शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत संचालक नारायण पाटील यांनी सांगितले. सॅम्पल घेऊन लिलाव करू नका. वाहनाजवळ जाऊनच शेत मालाचा भाव करावा, असे ठरले. त्यानंतर संचालक पाटील यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT