Sabudana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Groundnut Rate :आषाढी एकादशीच्या तोंडावर, शेंगदाणे, साबुदाणा स्वस्त

आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त बाजारपेठ सज्ज झाली असली तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत शेंगदाणे आणि साबुदाण्याच्या भावात घट झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) बाजारपेठ सज्ज झाली असली तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत शेंगदाणे (Groundnut) आणि साबुदाण्याच्या (Sabudana Rate) भावात घट झाली आहे. मात्र, भगरीच्या भावात सुधारणा आहे. बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांची आवक वाढली आहे.

आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी मोठा उत्सव. या एकादशीला भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. परंतु, ज्यांना आपल्या कामामुळे पंढरपूरला जाणे शक्‍य नाही, असे भाविक एकादशी भक्तिभावाने साजरी करतात. या दिवशी अनेकजण उपवास करतात. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठदेखील सज्ज झाली आहे. फळाच्या भावातही दहा टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांकडून फळांना अधिक मागणी आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. त्यामुळे मर्यादा आल्या होत्या. आता सर्वच निर्बंध काढण्यात आल्याने बाजारात धावपळ दिसत आहे. आषाढी एकादशी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने अनेक जण उपवास करतात. चवीला काहीसे गोड असलेल्या रताळ्याला उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे त्याची मोठी मागणी असते. बटाट्याची मागणीही वाढली असून ३५ ते ४० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे.

ग्राहकांना थोडाफार दिलासा देणारी बाब म्हणजे साबुदाण्याचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत किलोमागे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत दर्जेदार भगरीच्या दरात आठ ते १० रुपयांनी सुधारणा झाली आहे. सध्या १०० ते ११० रुपये प्रती किलो असा दर आहे. यासह विविध प्रकारचे पेंडखजूर बाजारात दाखल झाले आहेत. राजगिरा, उपवासाची भाजणी, चिवडा, उपवासाचा चिवडा, नॉयलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा आदी खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध असून तयार उपवास पदार्थांना गेल्या काही वर्षांत मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या एक किलो साबुदाण्याचा दर ६४ ते ७० रुपये आहे. तर १२० रुपये प्रती किलो दराने मिळणारे शेंगदाण्याचा दर सध्या ११० ते ११२ रुपयांच्या घरात आहे. उपवासानिमित्ताने तूप, शेंगदाणा तेल, साबुदाणा, शेंगदाणे, भगर यासह उपवासाचे तयार पीठ यास मागणी वाढली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढलेली आहे. महिन्याच्या प्रारंभीच एकादशी येत असल्याने बाजारात चैतन्य आहे. त्यामुळे शेंगदाणे, साबुदाण्याचे दर स्थिरावले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. भगरीच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे.
अनिल नागपाल, किराणा व्यापारी.

प्रतिकिलो दर

भगर - १०० ते ११० रुपये

साबुदाणा - ६४ ते ७० रुपये

शेंगदाणे - १०५ ते ११५ रुपये

पेंडखजूर - ९०-११०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

Zilla Parishad Seizure Action: यवतमाळ जिल्हा परिषदेवर जप्तीच्या कारवाईची नामुष्की

Revenue Communication Initiative: ‘शेतकरी हक्क जागर, शेतकऱ्यांसाठी महसूल संवाद ’

Raisin Making at Home: वेलीवरच सुकवून द्राक्षांपासून बेदाणा तयार करण्याची सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT