Grape Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Market : नैताळे खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी लिलाव सुरू

Team Agrowon

Grape Market News नाशिक : सध्या द्राक्ष काढणी हंगाम (Grape Harvesting Season) सुरू असून द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाऱ्या द्राक्षमण्यांना (Grape Beads) स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या वतीने नैताळे व परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या मागणीनुसार द्राक्ष हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरुवात केली आहे.

मुहूर्तावर तानाजी बोरगुडे यांचा द्राक्षमणी २९.५० रुपये प्रति किलो दराने (Grape Beads Rate) विक्री झाला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी २०९ क्रेट्स आवक होऊन किमान ५, कमाल ३१ तर सरासरी १९ रुपये प्रति किलो दर निघाले.

बाजार समितीने सदरचे खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्यापूर्वी द्राक्षमणी खरेदीदार थेट शेतावर जाऊन शिवार खरेदीद्वारे अत्यंत कमी भावात द्राक्षमण्याची खरेदी करून वजनमापातही शेतकऱ्यांची फसवणूक करीत होते.

शिवाय सुरुवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार घडले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने लासलगाव, उगाव, नैताळे व खानगाव नजिक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बाजार समितीच्या तत्कालीन सदस्य मंडळाने २८ मार्च २००५ पासून नैताळे येथे सुरुवात केली होती. गेल्या १८ वर्षांत या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

नैताळे केंद्रावर दरवर्षीच्या द्राक्षमण्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून आतापर्यंत १० लाख द्राक्षमणी क्रेट्सची आवक होऊन सुमारे १८ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

द्राक्षमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात. त्यामुळे द्राक्षे उत्पादक बांधावर द्राक्षमणी विक्री न करता खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी विक्रीस प्राधान्य देतात असे, , असे लासलगांव बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके यांनी सांगितले.

प्रशासक सविता शेळके, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी क्रेटचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहायक सचिव सुरेश विखे, सर्व लिलाव प्रमुख सुनील डचके, द्राक्षमणी खरेदीदार विष्णू गायकर, बापू धरम, अश्पाक शेख, पप्पू मोमीन, शरीफ पिंजारी, बालम शेख, अक्तर पिंजारी, जाकीर शेख, दादाभाई शेख, रफीक शेख, संदीप उगले, इमरान शेख, नैताळे खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी वाल्मीक खालकर, विनोद फलके, एम. एन. शिंदे, पी. आर. घायाळ यांच्यासह परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT